विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारत, 6G मानकीकरण करून अशा तंत्रज्ञानाचा जागतिक निर्यातदार बनू शकतो: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सचिव

Posted On: 29 OCT 2023 5:11PM by PIB Mumbai

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक अभय करंदीकर म्हणाले की, भारताचे स्वदेशी 5G तंत्रज्ञान, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक, उद्योग क्षेत्रातील जाणकार आणि स्टार्ट-अपमधील संशोधकांची वचनबद्ध आणि समर्पित व्यवस्थेत   देशाला मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञानात अग्रेसर म्हणून प्रस्थापित करण्याची क्षमता आहे .  ते आज 29 ऑक्टोबर 2023 रोजी इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये बोलत होते.

"आपल्याकडे 6G मानकीकरण करण्याची संधी आहे ज्याचा आपण यापूर्वी कधीही विचार केला नव्हता, तसेच येत्या काही वर्षांत आपण अशा तंत्रज्ञानाचे जागतिक निर्यातदार बनू शकतो  ," असे प्राध्यापक करंदीकर यांनी  6G  मानकीकरण वरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेदरम्यान आपल्या नियोजित सत्रात सांगितले. पंतप्रधानांनी 27 ऑक्टोबर 2023 रोजी उद्घाटन केलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसचा भाग म्हणून ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

आपल्याला ठाऊक असेलच की, 5G तंत्रज्ञान हे  2G आणि 3G मोबाईल नेटवर्कचे सुधारित  स्वरूप आहे, तर 6G तंत्रज्ञान हे खरोखरच आमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरेल आणि भारत 6G तंत्रज्ञानामधील संशोधन आणि प्रमाणेीकरणसाठी हे  तंत्रज्ञान आत्मसात करून मिळालेल्या संधीचा अनेक प्रकारे उपयोग करत आहे  असेही विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मोबाईल तंत्रज्ञानाच्या उदयामुळे , भारत जागतिक डेटा वापरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात मोठा हातभार लावत आहे आणि 2030 पर्यंत भारताचा वाटा एकंदरीत मोबाइल डेटा वापराच्या प्रमाणात उपलब्ध एकूण डेटापैकी एक तृतीयांश किंवा त्याहूनही अधिक असणार आहे.

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972855) Visitor Counter : 124