नौवहन मंत्रालय
बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने तिसऱ्या विशेष मोहीमेअंतर्गत(3.0)विविध उपक्रमांचे आयोजन
आजपर्यंत निरुपयोगी आणि अनावश्यक साहित्याची विल्हेवाट लावून अंदाजे1,17,09,095 रुपयांचा महसूल मिळविला
बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने आतापर्यंत एकूण 97 पैकी 94 स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत
Posted On:
27 OCT 2023 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालय सध्या तिसरी विशेष स्वच्छता मोहीम 3.0 राबवत आहे. सार्वजनिक तक्रारींचा प्रभावीपणे निपटारा, संसद सदस्यांचे संदर्भ, संसदेतील आश्वासने, कामाच्या ठिकाणी आणि परिसराच्या आसपासची स्वच्छता मोहीम, भंगाराची विल्हेवाट आणि निरुपयोगी फायली निकाली काढणे यांच्यावर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
आजपर्यंत 24,215 प्रत्यक्ष फायलींपैकी 24,023 फायलींचे पुनरावलोकन केले गेले आहे; निरुपयोगी 6847 फाईल्स ओळखण्यात आल्या, त्यापैकी 1857 निकाली काढण्यात आल्या आहेत; एकूण 13,848 ई-फाईल्स पुनरावलोकनासाठी ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी 1,012 चे पुनरावलोकन करण्यात आले आहे आणि त्यातील 7,538 बंद करण्यात आल्या आहेत.मोहिमेच्या जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 50 पेक्षा जास्त ट्वीट्स मंत्रालयाच्या आणि त्याच्या स्वायत्त संस्थांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे एक्सपोस्टवर,(पूर्वी Twitter म्हणून ओळखले जाणारे), फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वर पोस्ट केल्या आहेत.
ही स्वच्छता मोहीम जोरात सुरू असून ती 97 पैकी 94 ठिकाणी राबविण्यात आली आहे. आतापर्यंत 1,421 स्क्वेअर फूट जागा मोकळी करण्यात आली आहे. मंत्रालयाला 2015-16मध्ये1,17,09,095.रुपये भंगाराच्या विल्हेवाटीने मिळाले .91 सार्वजनिक तक्रारींपैकी 90 लक्ष्यांचे निराकरण केले आहे; 9 पैकी 6 पीएमओ संदर्भ साध्य केले; खासदारांच्या 59 संदर्भ उद्दिष्टांपैकी 47 साध्य झाले आहेत; संसदीय आश्वासनांच्या 42 उद्दिष्टांपैकी 37 साध्य झाली आहेत; 4 कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीमंडळ प्रस्तावांपैकी सर्व प्रस्ताव (कॅबिनेट प्रस्ताव) आणि सातही राज्य सरकारांच्या संदर्भांचे लक्ष्य साध्य केले गेले आहे.
2 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित केलेल्या या मोहिमेच्या मुख्य टप्प्याच्या स्वच्छतेसाठी हाती घेण्यात येणारी विशिष्ट लक्ष्ये ओळखण्याचे उद्दिष्ट 15 सप्टेंबर 2023 रोजी पूर्वतयारीच्या टप्प्यासह सुरू झाले होते.
N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972229)
Visitor Counter : 72