दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ‘ट्राय’ ने महाराष्ट्रातील औरंगाबादसह देशात इतर सतरा ठिकाणी आणि आजूबाजूच्या भागात घेतलेल्या ड्राइव्ह चाचण्यांचा अहवाल केला प्रसिद्ध

Posted On: 25 OCT 2023 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, ट्राय ने जून 2023 ला संपलेल्या तिमाहीचा महाराष्ट्रातील औरंगाबाद सह इतर सतरा ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच महामार्गांवर घेतलेल्या ड्राइव्ह चाचण्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केलेल्या सेवेच्या सेल्युलर/मोबाइल नेटवर्क गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी, व्हॉइस आणि डेटा सेवांसाठी ड्राइव्ह चाचण्या घेण्यात आल्या. ड्राईव्ह चाचण्या घेतल्या गेलेल्या शहरांचे आणि एल एस ए चे तपशील खाली दिले आहेत;

नेटवर्कसाठी मूल्यांकन केलेल्या मुख्य कार्यप्रदर्शन निर्देशकांमध्ये (KPIs) खालील गोष्टींचा समावेश आहे:

  1. व्हॉइस सेवेसाठी: कव्हरेज; कॉल सेटअप सक्सेस रेट (CSSR); ड्रॉप कॉल दर; ब्लॉक कॉल दर, हँडओव्हर सक्सेस दर; Rx गुणवत्ता.
  2. डेटा सेवांसाठी: डाउनलोड आणि अपलोड थ्रूपुट, वेब ब्राउझिंग विलंब, व्हिडिओ स्ट्रीमिंग विलंब आणि विलंब वेळ.

संपूर्ण अहवाल ट्रायच्या www.analytics.trai.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971028) Visitor Counter : 70