संरक्षण मंत्रालय
एआयएनएससी 2023: आयएनएस शिवाजी, लोणावळा येथे अखिल भारतीय नौसैनिक शिबिरात एनसीसीच्या नौदल शाखेतील छात्रसैनिकांची उत्कृष्ट कामगिरी
राष्ट्र उभारणी आणि युवा सक्षमीकरण हे आयएनएस शिवाजी नौदल तळावरील पहिल्या शिबिराचे उद्दिष्ट
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
अखिल भारतीय नौसैनिक शिबिर 2023 चा (एआयएनएससी 2023) आयएनएस शिवाजी, लोणावळा या प्रतिष्ठित नौदल तळावर समारोप झाला. यासह शिबीरा दरम्यान आयोजित देशभरातील 17 संचालनालयांमधील भारतातील सर्वोत्तम तरुण छात्रसैनिकांमधील वार्षिक 10 दिवसीय स्पर्धेची सांगता झाली. यंदा एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालय आणि नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने या अखिल भारतीय नौसैनिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी "आयएनएस शिवाजी येथे एआयएनएससी 2023 दरम्यान छात्रसैनिकांनी दाखवलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. हे शिबीर आमच्या तरुण छात्रसैनिकांची केवळ विलक्षण प्रतिभाच अधोरेखित करत नाही सहभागींमध्ये सौहार्दाची भावना देखील बळकट करते, या शिबिरासाठी दक्षिण नौसेना कमांड मुख्यालय आणि आयएनएस शिवाजी यांनी दिलेले पाठबळ आणि संसाधने हे राष्ट्र उभारणीप्रती त्यांच्या खऱ्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.", असे ते म्हणाले. छात्र सैनिकांइतक्याच उत्साहाने लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी मार्गदर्शन केले.
नेतृत्व कौशल्ये वाढवण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, सराव आणि कार्यशाळांसह या वर्षीच्या स्पर्धांमध्ये छात्रसैनिकांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आव्हान देणाऱ्या अनेक उपक्रमांचा समावेश होता. या वर्षी ही स्पर्धा महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालयाने जिंकली आणि आंध्रप्रदेश आणि तेलंगणा तंत्रशिक्षण संचालनालये उपविजेते ठरली.
AINSC20238SO3.jpg)
AINSC2023YGWY.jpg)
AINSC20235H5I.jpg)
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970764)
आगंतुक पटल : 136