पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केली चर्चा
सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर दिला भर
Posted On:
23 OCT 2023 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. मोदी यांनी यावेळी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर गरजेवर भर दिला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा केली. पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. आम्ही दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली . सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.”
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970267)
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam