संरक्षण मंत्रालय
स्वच्छता मोहीम 3.0 - संरक्षण उत्पादन विभाग
संरक्षण उत्पादन विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह संलग्न कार्यालये आणि विभागाने निश्चित केलेल्या देशभरातील 746 स्थळांवर आयोजित करण्यात आली स्वच्छता मोहीम
2700 मेट्रिक टन भंगार आणि इतर कचरायुक्त सामग्रीची विल्हेवाट लावल्यानंतर अंदाजे 7.5 लाख चौरस फूट जागा मोकळी
Posted On:
23 OCT 2023 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
संरक्षण उत्पादन विभाग सध्या विशेष मोहीम 3.0 राबवत आहे, यामध्ये स्वच्छतेच्या पद्धती रुजवणे आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांमधील प्रलंबीतता कमी करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या स्वच्छता मोहीम 3.0 मध्ये सर्व संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि संरक्षण उत्पादन संस्था या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाल्या असून देशभरात स्वच्छतेचा दर्जा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नाचे ही मोहीम प्रतिनिधित्व करते. आतापर्यंत, विभागातील संस्थांनी विशेष मोहिमेचा भाग म्हणून या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 746 स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत.
या प्रयत्नांची विविध समाजमाध्यम मंचावरही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कोणताही विद्यमान अनुशेष कमी करण्यासाठी विभाग प्रलंबित प्रकरणांचा सातत्याने आढावा घेत आहे.
मोहिमेच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी, संरक्षण उत्पादन विभागाने खालील टप्पे गाठले आहेत:
- निपटारा करण्याच्या दृष्टीने, 21000 फाईल्स/नोंदी आणि विलग केलेल्या फाइल्सचा आढावा घेण्यात आला
- भंगार/न वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावून 7.5 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली
- 2700 मेट्रिक टन भंगार/न वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली.
- भंगाराच्या विल्हेवाटीच्या माध्यमातून 20 कोटी महसूल प्राप्त झाला
- 153 सार्वजनिक तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
- 52 सार्वजनिक तक्रारींचे अपील निकाली काढण्यात आले
काटेकोर उद्दिष्टे आणि भक्कम देखरेख व्यवस्थेसह सुसज्ज असलेला विभाग विशेष मोहीम 3.0 मध्ये निर्धारित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे. या उपक्रमाची प्रगती दररोज सर्वोच्च स्तरावर तपासली जाते आणि डीएआरपीजीचे एससीडीपीएम पोर्टलवर सर्वात अलीकडील अद्यतने अपलोड केली जातात. समाजमाध्यमे, बॅनर, पोस्टर्स आणि आकर्षक चित्रकला स्पर्धांसह विविध माध्यमांद्वारे या मोहिमेबद्दल जनजागृती प्रसारित केली जाते.विशेष म्हणजे, डीपीएसयू आणि डीडीपी या दोघांद्वारे X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) समाज माध्यम पोस्टवर 570 हून अधिक ट्वीट शेअर केले गेले आहेत, सर्व #SpecialCampaign 3.0 सह टॅग केले आहेत.
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1970104)
Visitor Counter : 84