उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जनतेला दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 23 OCT 2023 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

त्यांच्या संदेशाचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे -

"भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या दसऱ्याच्या या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने मी माझ्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो. 

दसरा हा सण वाईटावर चांगल्याने आणि दुर्गुणांवर सद्गुणाने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे.  सद्गुणांवर असलेला आपला विश्वास दृढ करण्याची तसेच सत्य, न्याय, करुणा आणि धैर्य या मूल्यांना आत्मसात करण्याची आणि जपण्याची ही एक पर्वणी आहे.

हा सण आपल्या सर्वांना शांती, समृद्धी देवो आणि ऐक्याची भावना वृध्दिंगत करो."

 

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1970086) आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada