मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
‘मत्स्य संपदा जागरुकता अभियान’ बाबत कोची येथे 23 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित कार्यशाळेचे, मत्स्योद्योग विभागाचे सहसचिव करणार उद्घाटन
Posted On:
21 OCT 2023 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
मत्स्योद्योग विभागाचे सहसचिव (अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि प्रशासन) सागर मेहरा यांच्या हस्ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी कोची येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड ट्रेनिंग (NIFPHATT) येथे मत्स्यसंपदा जागरुकता अभियानाबाबतच्या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यशाळेत केरळ सरकारच्या मत्स्योद्योग विभागाचे सहसंचालक (मध्य क्षेत्र) एस. महेश केरळमध्ये पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यपालन विकास योजनांच्या अंमलबजावणीवर सादरीकरण करतील. सहसंचालक (अॅक्वाकल्चर) सेवानिवृत्त, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आणि सल्लागार (एनएफडीबी ) एम. शाजी हे, केरळमधील पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत एक्वाकल्चर तंत्रज्ञान आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पद्धतीबाबत मार्गदर्शन करतील. विभाग प्रमुख आणि प्रमुख वैज्ञानिक, क्यूएएम विभाग, सीआयएफटी, कोची, डॉ. झीनुद्दीन हे, पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या संदर्भात स्टार्ट-अप/उद्योजकतेमध्ये सीआयएफटीच्या उपक्रमांवर सादरीकरण करतील.
प्रक्रिया तंत्रज्ञ, NIFPHATT, कमलराज पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या संदर्भात मूल्यवर्धन आणि क्षमता निर्मितीत NIFPHATT च्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करतील. केरळच्या मत्स्यव्यवसाय विभाग, उपसंचालक (प्रशिक्षण) माजा जोस, संबंधितांशी संवाद साधतील आणि हितधारक कार्यक्रमादरम्यान त्यांच्या यशोगाथा सांगतील.
मच्छीमार, मच्छीमार प्रतिनिधी, मत्स्य-शेतकरी, उद्योजक, मच्छीमार सहकारी संस्थांचे नेते, व्यावसायिक, शास्त्रज्ञ आणि इतर हितधारक NIFPHATT येथे मत्स्यसंपदा जागरुकता अभियान कार्यशाळेदरम्यान परस्परसंवादात सहभागी होतील.
* * *
M.Pange/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969697)
Visitor Counter : 103