कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागात (डीएआरपीजी) विशेष मोहिम 3.0 च्या तिसऱ्या आठवड्यात डिजिटलीकरणाचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित
डीएआरपीजीने सी आर यू चे संपूर्ण डिजिटलीकरण आणि "डिजिटल डीएआरपीजी" संकल्पने अंतर्गत eHRMS2.0 ची अंमलबजावणी याचा केला अवलंब
Posted On:
21 OCT 2023 9:46AM by PIB Mumbai
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) विशेष मोहिम 3.0 च्या तिसऱ्या आठवड्यातही आपली मोहीम उत्साहाने सुरू ठेवली आहे. 16 ऑक्टोबर'23 पासून सुरू झालेला आठवडा 21 ऑक्टोबर 23 रोजी संपेल. याची संकल्पना डिजिटल डीएआरपीजी आहे. सर्व कार्यालये पूर्णपणे डिजिटल बनवण्यासाठी डिजिटलीकरणाचा अवलंब करण्यावर या आठवड्यात लक्ष केंद्रित केले गेले.
डीएआरपीजीने या आठवड्यात, पूर्णपणे डिजिटल सी आर यू स्वीकारले असून त्यांचे कार्यालय कागदविरहीत केले आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने या आठवड्यात सी आर यू ला भेट दिली. सी आर यू आधीच डिजीटल झाले असले तरी त्यात सुधारणा करण्यास वाव आहे असे यावेळी आढळले. सी आर यू मध्ये पुरेशा प्रमाणात प्रचंड क्षमतेचे स्कॅनर आधीच पुरवले गेले आहेत. वैयक्तिक अधिकारी आणि विभाग देखील स्कॅनरसह सुसज्ज आहेत. डीएआरपीजी 100% ई पोचपावती (eReceipts) वातावरणात काम करत आहे. सी आर यू च्या उत्तम व्यवस्थापनासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
डीएआरपीजी मधील सर्व कर्मचारी eHRMS2.0 वर आहेत आणि सर्व प्रारुप कार्यरत आहेत. eHRMS2.0 मध्ये रजेचे अर्ज, आगाऊ रक्कम, प्रतिपूर्ती, आगाऊ जीपीएफ आणि इतर सर्व कर्मचाऱ्यां संबंधित बाबी ऑनलाईन हाताळल्या जात आहेत. मुलांचा शिक्षण भत्ता (सीईए), एचबीए, एलटीसी, टेलिफोन शुल्क प्रतिपूर्ती, वैद्यकीय शुल्क, वृत्तपत्र शुल्क प्रतिपूर्ती आता डिजिटल डीएआरपीजी मध्ये ऑनलाइन आहेत.
विशेष मोहीम 3.0 च्या दैनंदिन प्रगतीचे परिक्षण डीएआरपीजी मधील समर्पित पथकाद्वारे केले जाते आणि एससीडीपीएम पोर्टलवर ते दररोज अपलोड केले जाते.
***
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969653)
Visitor Counter : 108