अल्पसंख्यांक मंत्रालय

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी स्वच्छता मोहिमेत घेतला भाग;मंत्रालयातील कर्मचारीवर्गाला दैनंदिन जीवनात अधिक उत्तम स्वच्छतेच्या सवयी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि विशेष मोहीम 3.0 मधील अधिक मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी सर्वांना प्रेरित केले


सार्वजनिक तक्रारी तसेच अपिलांवर कार्यवाही, टाकाऊ सामान काढून टाकण्यासाठी स्वच्छता मोहिमा आणि या सामानाची विल्हेवाट यावर या मोहिमेत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले

Posted On: 20 OCT 2023 12:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी नवी दिल्ली येथील सीजीओ संकुलातील पंडित दीनदयाळ अंत्योदय भवन परिसरातील मंत्रालय तसेच आजूबाजूच्या भागात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. त्यांनी मंत्रालयातील कर्मचारी वर्गाला दैनंदिन जीवनात अधिक उत्तम स्वच्छतेच्या सवयी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच विशेष स्वच्छता मोहीम 3.0 आधील अधिक मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी प्रेरित केले.

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालय सचिव कटीकिथलाश्रीनिवास तसेच अतिरिक्त सचिव खिल्ली राम मीणा यांनी दर आठवड्याला नियमितपणे या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि सर्व जेएसएस/डीडीजी यांना प्रलंबित संदर्भित प्रकरणे निकाली काढण्याच्या तसेच जुन्या फायली आणि कागदोपत्री नोंदी चाळून वेगळ्या काढण्याच्या तसेच टाकाऊ/भंगार सामानाच्या विल्हेवाटीच्या देखील सूचना दिल्या. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा झाल्यानंतर त्याची माहिती नियमितपणे एससीडीपीएम पोर्टलवर अद्ययावत करण्यात येत आहे.

(i) दिनांक 14.09.2023 रोजीपर्यंत प्रलंबित असलेल्या 317 तक्रारी आणि 63 अपिलांवर याआधीच कार्यवाही करण्यात आलेली आहे.

(ii) स्वच्छता मोहिमेसाठी निश्चित करण्यात आलेल्या चार ठिकाणी विशेष मोहीम 3.0 दरम्यान स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या.

(iii) भंगार आणि टाकाऊ सामानाच्या विल्हेवाटीनंतर 1400 चौरस फुट कार्यालयीन जागा मोकळी झाली.

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या राजस्थानातील दर्गा ख्वाजा साहेब अजमेर, राष्ट्रीय अल्पसंख्यक  विकास आणि आर्थिक महामंडळ, केंद्रीय वक्फ मंडळ, भारतीय हज समिती या  संघटना/ दुय्यम कार्यालयांनी देखील विशेष मोहीम 3.0 मध्ये सक्रियतेने भाग घेतला. ही मोहीम परिणामकारक तसेच फलदायी ठरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालय आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विशेष मोहीम 3.0 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेत   सार्वजनिक तक्रारींचे परिणामकारक निवारण, खासदारांकडून संदर्भित प्रकरणे, आंतर-मंत्रालयीन संदर्भित प्रकरणे, संसदीय आश्वासने, स्वच्छता मोहीम, टाकाऊ सामानाची विल्हेवाट या घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रारंभिक तयारीच्या टप्प्यात (14 ते 30 सप्टेंबर 2023) अधिकाऱ्यांना जागरूक करणे, मोहिमेसाठी मूलभूत पातळीवरील कार्यकर्त्यांना चालना देणे, प्रलंबितता निश्चित करणे, मोहिमेसाठी ठिकाणे ठरवणे, टाकाऊ तसेच निरुपयोगी सामान निवडणे इत्यादी कार्ये करण्यात आली.

***

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969372) Visitor Counter : 89