शिक्षण मंत्रालय
युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
युवा संगमच्या विविध टप्प्यांतील 73 विविध दौऱ्यात देशभरातल्या 3,240 हून अधिक स्पर्धकांनी घेतला होता सहभाग
Posted On:
18 OCT 2023 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2023
एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) अंतर्गत युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी नोंदणी करण्याच्या पोर्टलची आज सुरुवात झाली. युवा संगम हा भारत सरकारचा देशातील विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील युवकांमध्ये परस्परसंबंध मजबूत करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.युवा संगमच्या आगामी टप्प्यात सहभागी होण्यासाठी युवा संगम पोर्टलवर, प्रामुख्याने 18-30 वयोगटातील इच्छुक तरुण,विद्यार्थी, NSS/NYKS स्वयंसेवक, नोकरी करणारे/स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.
याविषयीची तपशीलवार माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: https://ebsb.aicte-india.org/
31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस या उपक्रमादरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांतील लोकांमधील चिरंतन आणि रचनात्मक सांस्कृतिक संपर्काची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना साकार करण्यासाठी, 31 ऑक्टोबर 2016 पासून EBSB पोर्टलची सुरुवात झाली होती.
* * *
R.Aghor/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968756)
Visitor Counter : 147