पोलाद मंत्रालय

पोलाद मंत्रालयाच्या सचिवांनी स्वच्छता विशेष मोहिम 3.0 अंतर्गत राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने (एन एम डी सी) केलेल्या कामाचा घेतला आढावा

पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी ओळखून राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने स्वच्छता मोहिमेअंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल सचिवांनी केले कौतुक

Posted On: 18 OCT 2023 10:25AM by PIB Mumbai

पोलाद मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा आणि पोलाद मंत्रालयाचे सहसचिव अभिजित नरेंद्र यांनी काल (17.10.2023) दिल्लीतील एन एम डी सी लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट दिली आणि स्वच्छता विशेष मोहिम 3.0 अंतर्गत एन एम डी सी ने हाती घेतलेल्या उपक्रमांचा व्यापक आढावा घेतला.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या सध्या सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेच्या प्रगतीचे मूल्यांकन करून सभोवतालचा समाज आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा आढावा घेणे हा पोलाद मंत्रालयाच्या सचिवांच्या भेटीमागील उद्देश होता. केंद्र सरकार प्रणित स्वच्छता मोहिमेला आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी एन एम डी सी स्वच्छता विशेष मोहिम 3.0 मध्ये सक्रिय सहभाग घेत आहे.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने पर्यावरणाप्रती दाखवलेली जबाबदारीची जाणीव आणि स्वच्छतेबद्दलच्या वचनबद्धतेचे नागेंद्र नाथ सिन्हा यांनी कौतुक केले.

***

Sonal T/ Bhakti S/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968666) Visitor Counter : 80