कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सध्या सुरू असलेल्या स्वच्छता विशेष मोहिम 3.0 च्या पहिल्या दोन आठवड्यात केवळ भंगाराची विल्हेवाट लावून सरकारने मिळवला 117 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल - डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2023 5:07PM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या स्वच्छता विशेष मोहिम 3.0 च्या पहिल्या दोन आठवड्यात केवळ भंगाराची विल्हेवाट लावून सरकारने 117 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवला आहे, पहिल्या दोन आठवड्यांच्या अखेरीला मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.तसेच यामुळे 32.54 लाख चौरस फूट इतकी कार्यालयीन जागा वापरासाठी उपलब्ध झाली आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे विशेष मोहीम 3.0 च्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रगतीचा आढावा घेताना प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग या नोडल एजन्सीचे यासाठी कौतुक केले.
मंत्रालये/विभाग आणि त्यांच्या क्षेत्रीय /दुर्गम भागातील कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. त्यांनी मंत्रालय/विभागांना मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये देशाच्या सर्व भागांमधील सर्व दुर्गम भागातील कार्यालये/संरक्षण आस्थापने आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये ही मोहीम राबवण्यासाठी शंभर टक्के अंमलबजावणीचा दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन केले.
12 ऑक्टोबर 2023 रोजी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी पश्चिम नौदल कमांड मुख्यालय, वस्त्रोद्योग आयुक्त अधिकारी, अतिरिक्त डीजीएफटी कार्यालय, जीपीओ मुंबई, सीएसएमटी मुंबई रेल्वे स्थानक या मुंबईतील केंद्रीय सरकारी कार्यालयांना क्षेत्रीय भेटी दिल्या.

विशेष मोहीम 3.0 च्या प्रगतीचे निरीक्षण एका समर्पित पोर्टलवर (https://scdpm.nic.in/ ) दैनंदिन आधारावर केले जाते. मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नोडल अधिका-यांसह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियमित आढावा बैठका घेतल्या जातात.
मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये, 2,12,459 सार्वजनिक तक्रारी आणि अपीलांचे निराकरण करण्यात आले आहे, तर 1,403 खासदारांच्या संदर्भांना देखील उत्तरे देण्यात आली आहेत.
विशेष मोहिमेचा अवलंब केल्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रलंबितत बाबींमध्ये घट झाल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली आणि सर्व अधिकार्यांना तीन आठवड्याच्या अखेरीस 75% लक्ष्य साध्य करण्यासाठी ही गती कायम ठेवण्याचे आवाहन केले
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968547)
आगंतुक पटल : 114