रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
दर्जेदार रस्ते सुरक्षा आणि डिजिटल अंमलबजावणीसाठी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या (एटीएमएस) मानकात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली वाढ
Posted On:
17 OCT 2023 4:52PM by PIB Mumbai
रस्ते सुरक्षा सुधारणे आणि अपघात घटनांना प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एन एच ए आय ने आपले सुधारित धोरण जारी केले आहे. याद्वारे सुधारित आणि भविष्यवेधी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) मानके आणि तपशील 2023 ची अंमलबजावणी केली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील नवीनतम शोधांचा उपयोग करून , राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर रस्ते सुरक्षा आणि डिजिटल अंमलबजावणीत हा उपक्रम सुधारणा करेल.
वाहतूक नियमांच्या डिजिटल अंमलबजावणीवर जोर दिला जाणार आहे. त्या अंतर्गत आधीच्या व्हीआयडीएस कॅमेऱ्यांच्या जागी नव्याने आलेली व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन अँड एन्फोर्समेंट सिस्टम (व्हिआयडीईएस) स्वीकारली जाईल. दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचे उल्लंघन, चुकीच्या मार्गिका किंवा दिशेने वाहन चालवणे, महामार्गावरील प्राण्यांचा वावर आणि पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडणे यासह 14 वेगवेगळ्या घटना ओळखण्याची व्हिआयडीईएसची क्षमता आहे. आढळलेल्या घटनेच्या आधारावर, मार्गावरील गस्ती वाहनांना किंवा रुग्णवाहिकांना व्हिआयडीईएस सतर्क करेल, ई-चलान तयार करेल, जवळपासच्या व्हेरिएबल मेसेजिंग बोर्डांना संबंधित संदेश पाठवेल किंवा जवळच्या प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’ मोबाइल अॅपद्वारे सूचना पाठवेल.
सर्वसमावेशक चित्रिकरण व्याप्तीसाठी, हे कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 10 किमी अंतरावर स्थापित केले जातील, प्रत्येक 100 किमीवर विविध कॅमेरा चित्रिकरण एकत्रित करणारी अत्याधुनिक सूचना आणि नियंत्रण कक्ष आहेत.
याशिवाय वाहतूक देखरेख ट्रॅफिक कॅमेरा प्रणालीही अद्ययावत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 1 किमीवर ती बसवली जाईल.
प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी माहिती प्रदान करून आपत्ती व्यवस्थापनात, एटीएमएस सक्रिय भूमिका बजावू शकतात. महामार्गाच्या स्थितीचे ऑनलाइन सामायिकरण आणि इतर महत्वाची माहिती देखील हे प्रदान करतील, त्यामुळे संस्था आणि महामार्ग वापरकर्त्यांना मदत होईल.
***
S.Kane/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968539)
Visitor Counter : 158