पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने  विविध रामसर स्थळांसभोवतालच्या पाणथळ जागांची केली स्वच्छता

Posted On: 17 OCT 2023 3:27PM by PIB Mumbai

 

2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान सुरू असलेल्या स्वच्छता विशेष मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्य/केंद्रशासित प्रदेश पाणथळ जमीन प्राधिकरणाच्या सहकार्याने देशभरातील विविध अमृत वारसा स्थळे म्हणजेच रामसर स्थळांच्या सभोवताली असलेल्या पाणथळ जमिनींची स्वच्छता केली. एक निरोगी आणि स्वच्छ पाणथळ जमीन संवर्धनाची मूल्ये आणि त्यामुळे होणारे फायदे याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पाणथळ जमीन प्राधिकरणांकडून स्वच्छता मोहीम, तण उपटून टाकणे, पाणथळ जमिनींच्या रक्षणाचा संकल्प करणे आणि पाणथळ जमीन मित्रांची नोंदणी यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पाणथळ जमिनी वाचवाया पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अभियानांतर्गत हा देशव्यापी कार्यक्रम राबवण्यात आला.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी जागतिक पाणथळ जमीन दिवसाच्या निमित्ताने पाणथळ जमिनींबाबत एक संपूर्ण समाजाचा दृष्टीकोन म्हणून पाणथळ जमिनी वाचवा ही मोहीम सुरू केली होती.

 

छायाचित्र 1: वेंबनाड-कोल, केरळ

छायाचित्र 2: पल्लीकरनाई दलदल, तामिळनाडू

छायाचित्र 3: यशवंत सागर, मध्य प्रदेश

छायाचित्र 4: नंद लेक, गोवा

छायाचित्र 5: भोज पाणथळ जमीन, मध्य प्रदेश

छायाचित्र 6: कुनथानकुलम, तामिळनाडू

छायाचित्र   7: शाख्य सागर, मध्य प्रदेश

छायाचित्र 8: सुंचींद्रम थिऊर, तामिळनाडू

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968531) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu