संरक्षण मंत्रालय
आयएनएस ब्यासचे मिड लाइफ अपग्रेड आणि ते पुन्हा सक्षम बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा कोची शिपयार्ड लिमिटेड बरोबर करार
Posted On:
16 OCT 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023
"आय एन एस ब्यास "चे मध्यकालीन अद्ययावतीकरण (मिड लाइफ अपग्रेड) आणि या युद्धनौकेला ते पुन्हा सक्षम बनवण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने 16 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे कोचीस्थित मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) सोबत 313.42 कोटी रुपयांचा करार केला.
वाफेच्या इंजिनावर चालणारी आय एन एस ब्यास ही ब्रह्मपुत्रा श्रेणीतील पहिली युद्धनौका असून ती डिझेलवर चालवण्याच्या दृष्टीने तिच्यात बदल केले जाणार आहेत. आय एन एस ब्यास "चे मध्यकालीन अद्ययावतीकरण पूर्ण झाल्यावर आणि पुन्हा सक्षम बनवल्यानंतर ती 2026 मध्ये भारतीय नौदलाच्या सक्रिय ताफ्यात आधुनिक शस्त्रास्त्र संच आणि अद्ययावत लढाऊ क्षमतेसह सामील होईल.
युद्धनौकेचा कायापालट करून पुन्हा सक्षम बनवण्याच्या या पहिल्या परिवर्तनकारी प्रकल्पामुळे भारतीय नौदलाची देखभाल प्रक्रिया आणि मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या दुरुस्ती क्षमतांमध्ये झालेली महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येते. या प्रकल्पामध्ये 50 पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सहभागी होतील, ज्यामुळे 3500 हुन अधिक जणांसाठी रोजगार निर्मिती होईल.
भारत सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताचा अभिमानास्पद ध्वजवाहक असेल.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968139)
Visitor Counter : 136