सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने साजरा केला 'पांढरी काठी दिन'

Posted On: 16 OCT 2023 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

दिव्यांग लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि त्यात सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अंधांसाठी असलेल्या आचारनियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी जगभरात 'पांढरी काठी दिन'  पाळला जातो. दृष्टिहीन लोकांसाठी, पांढरी काठी हे स्वातंत्र्याचे आणि गतिशीलतेचे प्रतिनिधित्व करते आणि आता तर ते मुक्ती, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास यांचेही प्रतिनिधित्व करते.ही काठी दृष्टिहीन व्यक्तीला मुक्तपणे फिरण्यास आणि आपली दैनंदिन कामे पूर्णत्वास नेण्यास मदत करते.

NILD WCD.jpg

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग (DEPwD) हा देशातील दिव्यांग  व्यक्तींच्या सर्वसमावेशक विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवणारा विभाग आहे. पांढर्‍या काठीच्या महत्त्वाविषयी जनसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने,या विभागाने  तीसहून अधिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्रे आणि वेबिनार, मुलाखती आणि मेळावे यांसारखे विविध उपक्रम राबवून, संबंधित संस्थांमार्फत पांढरी काठी दिन साजरा केला,ज्यात आयआयटीतील माजी प्राध्यापक आणि सीआरपीएफचे माजी कर्मचारी यांच्या विशेष मुलाखती सादर केल्या गेल्या. या कार्यक्रमानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ व्हिज्युअल डिसॅबिलिटीज यांनी एक प्रचारफेरी काढली.

त्याचप्रमाणे दिव्यांग  व्यक्ती सक्षमीकरण विभागासंबंधीत  इतर राष्ट्रीय संस्था, सीआरसी आणि इतर संलग्न संस्थांनी देखील पांढरी काठी दिन साजरा केला.

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968085) Visitor Counter : 125