आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवर आणि रुबेला लसीकरण व्याप्ती वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या अधिक व्यापक मिशन इंद्रधनुष 5.0 (आयएमआय 5.0) मोहिमेच्या तिन्ही फेऱ्यांचा समारोप 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार


आयएमआय 5.0 ही मोहीम देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात असून त्यात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचे लसीकरण होत आहे

देशभरात आयएमआय 5.0 मोहिमेच्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 34 लाखांहून अधिक बालके आणि 6 लाख गर्भवती महिलांचे लसीकरण

मिशन इंद्रधनुष अंतर्गत 2014 पासून आतापर्यंत एकूण 5.06 कोटी बालके आणि 1.25 कोटी गर्भवती महिलांचे लसीकरण

Posted On: 12 OCT 2023 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पथदर्शी नियमित अधिक व्यापक   मिशन इंद्रधनुष 5.0  (आयएमआय  5.0)लसीकरण मोहिमेच्या तिन्ही  फेऱ्यांचा 14 ऑक्टोबर 2023 रोजी समारोप होणार आहे. देशभरात लसीकरण मोहिमेत सहभागी होऊ न शकलेल्या आणि बाकी राहिलेल्या बालके  आणि गर्भवती महिलांपर्यंत  नियमित लसीकरण सेवा पोहोचवणे हे आयएमआय  5.0 मोहीम सुनिश्चित करते. यावर्षी, प्रथमच ही मोहीम देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे आणि त्यात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे (मागील मोहिमांमध्ये 2 वर्षांपर्यंतच्या बालकांचा  समावेश होता).

राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार  (एनआयएस)  सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम  (यूआयपी) अंतर्गत प्रदान केलेल्या सर्व लसींची लसीकरण व्याप्ती वाढवणे हेआयएमआय  5.0  मोहिमेचे उद्दिष्ट आहे.  2023 पर्यंत गोवर आणि रुबेलाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने गोवर आणि रुबेला लसीकरण व्याप्ती वाढवण्यावर आणि देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर  नियमित लसीकरणासाठी यु -विन  डिजिटल मंचाचा वापर करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

आयएमआय  5.0 ही मोहीम तीन फेऱ्यांमध्ये म्हणजेच , 7 -12 ऑगस्ट, 11-16 सप्टेंबर आणि 9-14 ऑक्टोबर 2023, म्हणजे, नियमित लसीकरण दिवसाच्या समावेशासह महिन्यातून 6 दिवस.आयोजित करण्यात आली .  बिहार, छत्तीसगड, ओदीशा आणि पंजाब वगळता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत आयएमआय  5.0 मोहिमेच्या तिन्ही  फेऱ्या पूर्ण करतील.काही अपरिहार्य परिस्थितीमुळे ही चार राज्ये ऑगस्टमध्ये आयएमआय 5.0 मोहीम सुरू करू शकली नाहीत. या राज्यांनी पहिली फेरी पूर्ण केली आहे आणि सध्या दुसरी फेरी आयोजित केली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये आयएमआय  5.0 मोहिमेची तिसरी फेरी आयोजित करण्याची त्यांचे नियोजन आहे.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत, देशभरात आयएमआय 5.0 मोहिमेच्या पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 34,69,705 हून अधिक बालके आणि 6,55,480 गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.

 

संचालक, (आरोग्य सेवा संचालनालय [कुटुंब कल्याण], एसआयओ आसाम यांनी जिल्हा अधिकार्‍यांसह सिपझार बीपीएचसी , डरांग जिल्हा, आसाम अंतर्गत एचआरए  ब्रिकलिनला भेट दिली

सिक्कीममधील लहान मुले, नवजात बालके  आणि गर्भवती महिलांची लसीकरण स्थिती तपासण्यासाठी लसीकरण शिबिरे आणि मदत शिबिराच्या क्षेत्रांचे पर्यवेक्षण आणि निरीक्षण

मणिपूरमधील आयएमआय सत्रात लस दिल्यानंतर बाळाला मदत करताना एएनएमसह लसीकरणकर्ता

एचएससी  बहंग, तालुका  नाग्गर , कुल्लू, हिमाचल प्रदेश येथे आयएमआय  सत्र
 

19 जुलै ते 23 जुलै 2023 दरम्यान राष्ट्रीय निरीक्षकांद्वारे  आयएमआय 5.0 साठी तयारीचे मूल्यमापन करण्यात आले.त्यांनी 27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 154 उच्च-प्राधान्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये व्यापक तयारीचे मूल्यांकन केले. शिफारशींसह सज्जता मूल्यांकनाचे निष्कर्ष सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सामायिक करण्यात आले.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी 23 जून 2023 रोजी राष्ट्रीय राजधानी येथे आयएमआय 5.0 वर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

संवाद  धोरणासह परिचालन मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांसह सामायिक करण्यात आली. संवाद  धोरणामध्ये पाठबळ , लस संकोच दूर करणे आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्तींची आणि  नेत्यांची मदत यांसारख्या  धोरणांसह 360-अंश  संवाद  दृष्टिकोन   समाविष्ट आहे. संदेशांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आणि मुख्य संदेशांसह प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माहिती, शिक्षण आणि संवाद  साहित्य सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह सामायिक करण्यात आले.

लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रांना भेट देण्यासाठी तसेच  कुटुंबातील आणि समुदायातील मुले आणि गर्भवती महिलांसाठी लसीच्या कोणत्याही चुकलेल्या मात्रा घेण्यासाठी आवाहन करण्यासाठी आयएमआय  5.0 अंतर्गत जनप्रतिनिधींचा सहभाग पाहायला मिळाला आणि  लोकांना आवाहन करण्यासाठी समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्ती  सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून मोठ्या संख्येने पुढे आल्या आहेत.

2014 पासून देशभरात मिशन इंद्रधनुषचे 11 टप्पे पूर्ण झाले आहेत. 12 वा टप्पा सध्या चालू आहे, मोहिमेअंतर्गत आजपर्यंत एकूण 5.06 कोटी बालके आणि 1.25 कोटी गर्भवती महिलांचे  लसीकरण करण्यात आले आहे.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1967029) Visitor Counter : 234