पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

भारताची ऊर्जेची मागणी भविष्यातील आर्थिक विकासाला इंधन पुरवठा करत राहील तसेच, येत्या काळात, त्यात झपाट्याने वाढही होईल: पेट्रोलियम मंत्री हरदीप एस. पुरी


पुरी यांच्या हस्ते 26 व्या ऊर्जा तंत्रज्ञान  बैठकीचे उद्घाटन

Posted On: 10 OCT 2023 1:33PM by PIB Mumbai

 

हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीविषयी बोलतांना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु तसेच गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की नोव्हेंबर 2022 पर्यंत, 10 टक्के जैव इंधन मिश्रण करण्याचे उद्दिष्ट पाच महीने आधीच पूर्ण झाले आहे. तसेच 20 टक्के जैवइंधन मिश्रणाचे ध्येय 2030 च्या ऐवजी 2025 सालीच साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा तंत्रज्ञान बैठकीच्या 26 व्या बैठकीत ते बोलत होते.

ऊर्जा क्षेत्रातील उपलब्धता, परवडणारे इंधन आणि शाश्वतता या तीन आव्हानांचे व्यवस्थापन करण्याबद्दल त्यांनी सांगितले की  सुरुवात करताना शाश्वततेशी संबंधित आव्हानांनी आपला वेग कमी झाला नाही तर आपण वेगाने वाटचाल केली.

आता आपल्याकडे 20 टक्के मिश्रित इंधन आहे, तेव्हा आम्ही इथेनॉल आणि बायोगॅस प्रकल्प स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्या देखील, तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगती करत आहेत. अलीकडेच शुभारंभ करण्यात आलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या हरित हायड्रोजन बसचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, की आता आम्ही नव्या तंत्रज्ञानाच्या मानसिकतेत जातो आहोत, आपल्याकडे इलेक्ट्रिक गाड्या  आणि फ्लेक्सी फ्यूएल वाहने आहेत.

देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या मागणीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, भारताची ऊर्जेची मागणी भविष्यातील आर्थिक विकासासाठी इंधन पुरवत राहील आणि येत्या काही वर्षांत ती झपाट्याने वाढेल. ते म्हणाले की, देश सध्या तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक, तिसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक, चौथा सर्वात मोठा एलएनजी आयातदार, चौथा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश आणि वाहनांची चौथी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

येत्या दोन दशकांत, जगातील एकूण ऊर्जा मागणीपैकी 25 टक्के मागणी एकट्या भारतातून राहण्याची शक्यता आहे  यावर त्यांनी भर दिला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उच्च तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने 9-11 ऑक्टोबर 2023 दरम्यान , भारत मंडपम या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातही 26 वी ऊर्जा तंत्रज्ञान बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या परिषदेची संकल्पना  "उर्जेचा उदयोन्मुख कल आणि तेल शुद्धिकरणाचे भविष्य" अशी आहे.

जगभरातील 27 तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांनी, ऊर्जा क्षेत्रातील अलीकडील तांत्रिक प्रगतीचे मॉडेल्स दाखवणारे स्टॉल या प्रदर्शनात लावले आहेत. या बैठकीला देश- विदेशातील 1300 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966403) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu