विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी रुग्णसेवेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उपलब्ध अत्याधुनिक निदान आणि उपचार पद्धतींचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञान , क्वांटम आणि इतर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्यकीय कौशल्य वाढवण्याचा मांडला प्रस्ताव


"प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा @2047 च्या भारताचे भावी शिल्पकार असलेल्या युवकांची उर्जा टिकवून ठेवण्यास मदत करेल"

Posted On: 08 OCT 2023 1:49PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी रुग्णसेवेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उपलब्ध अत्याधुनिक निदान आणि उपचार पद्धतींचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम आणि इतर नवीन तंत्रज्ञानासह वैद्यकीय कौशल्य वाढवण्याचा प्रस्ताव सुचवला आहे.  डॉ जितेंद्र सिंह बंगळुरू येथील रामय्या वैद्यकीय महाविद्यालयात नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस (इंडिया),एनएएमएस च्या 63 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते.

विशेषत: तरुण व्यावसायिकांमध्ये नियमितपणे कौशल्य विकासावर भर देत, प्रसिद्ध मधुमेहतज्ञ आणि वैद्यकीय शाखेचे प्राध्यापक असलेले डॉ. जितेंद्र सिंह  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रतिबंधात्मक आणि एकात्मिक आरोग्य सेवेमध्ये अग्रेसर राहिला आहे. देशातील सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यासाठी एनएएमएस सारख्या व्यावसायिक वैद्यकीय संस्था आणि सरकार  एकत्र येऊ शकतात असे ते म्हणाले.

गेल्या 9 वर्षांत भारत हे  एक किफायतशीर वैद्यकीय उपचारांचे ठिकाण बनले आहे आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून केलेल्या अनेक पथदर्शी आरोग्य सेवाविषयक  सुधारणा आणि सक्षम तरतुदींमुळे हे शक्य झाले आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

आरोग्य सेवेला  मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.

लोकांचे आयुर्मान वाढल्यामुळे अमृत काळात भारताला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

“70% पेक्षा जास्त लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. एकीकडे भारतात युवा लोकसंख्येची मोठी टक्केवारी आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे वृद्धांची संख्या वाढत आहे. त्यामुळे , रोगांचा प्रसार रोखण्याचे तसेच वयोमानानुसार मर्यादित होणाऱ्या क्षमतांवर देखील लक्ष ठेवण्याचे दुहेरी आव्हान आपल्यासमोर आहे,” असे ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965754) Visitor Counter : 141