पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल कुस्तीगीर अमन शेरावत याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.

Posted On: 06 OCT 2023 10:04PM by PIB Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धेत  आज पुरुष कुस्ती 57 किलो विभागात कांस्य पदक मिळवल्याबद्दल कुस्तीगीर अमन शेरावत याचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले .

शेरावतला  लक्षणीय यशाकडे नेणाऱ्या, त्याने प्रदर्शित केलेल्या  अजोड तंत्राची त्यांनी प्रशंसा केली. 

एक्सवर पंतप्रधानांनी लिहिले आहे की,

“पुरुष कुस्ती 57 किलो विभागात कांस्य पदक मिळवल्याबद्दल कुस्तीगीर अमन शेरावत याचे अनेकवार अभिनंदन!”

“त्याने प्रदर्शित केलेल्या  अजोड तंत्राने त्याला लक्षणीय यशाकडे नेले. त्याने घेतलेले परिश्रम आणि प्रशिक्षण याचा हा नमुना आहे.”

*****

Jaydevi PS/Vijaya/CYadav 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965326) Visitor Counter : 85