वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

संयुक्त अरब अमिराती -भारत सहकार्य बळकट करण्याबद्दल  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी व्यक्त केला विश्वास


वाढती आर्थिक वृद्धी  आणि बळकट सहकार्य   उभय देशांमधील  उद्योगांना  वेगवान विकासाच्या संधी  प्रदान करते : गोयल

अन्न सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा सुरक्षा, हवामान बदलावर मात करण्यापासून ते अंतराळ  तंत्रज्ञानापर्यंत ही भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील  सहकार्याची महत्त्वपूर्ण क्षेत्रे  :पीयूष  गोयल

1.4 अब्ज आकांक्षी  नागरिकांसह भारताकडून संयुक्त अरब अमिरातीला उद्योगांसाठी  महत्त्वपूर्ण संधी प्रदान  :  गोयल

भारत-संयुक्त अरब अमिराती यांच्यात 21 व्या शतकातील सहकार्य  आणि बंधुत्व परिभाषित करण्यासाठी उभय देशांतील लोकांमधील प्रेम आणि आपुलकी आणि व्यवसायांचे मोठे योगदान  :पीयूष  गोयल

Posted On: 06 OCT 2023 12:00PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी संयुक्त अरब अमिराती -भारत सहकार्य बळकट करण्यासंदर्भात विश्वास व्यक्त केला आहे . उभय देशांची वाढती आर्थिक वृद्धी आणि सहकार्य बळकट  केल्याने दोन्ही देशांमधील उद्योगांच्या  वेगवान विकासासाठी संधी प्राप्त होतात, असे गोयल यांनी अबू धाबी चेंबरने आयोजित केलेल्या भारत आणि संयुक्त अरब  अमिरातीमधील  मधील शीर्ष  उद्योजकांच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले.

या सहकार्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर गोयल यांनी भर देत भारताचे दुसरे-सर्वात मोठे निर्यातीचे ठिकाण  , तिसरा -सर्वात मोठे व्यापार भागीदार आणि थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात मोठा  गुंतवणूकदार म्हणून संयुक्त अरब अमिरातीचा त्यांनी उल्लेख केला.दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी ही सहकार्यासाठी बळकट  पाया तयार करते, असे ते म्हणाले.उभय राष्ट्रांचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरा, सध्याच्या क्षमता आणि भविष्यातील संधी सामायिक असून  यामुळे हे सहकार्य  आणखी दृढ होण्यासाठी  चालना मिळेल, असा विश्वास मंत्री गोयल यांनी व्यक्त केला

अन्न सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा सुरक्षा, हवामान बदलावर मात करण्यापासून ते अंतराळ  तंत्रज्ञानापर्यंत ही भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील  सहकार्याची महत्त्वपूर्ण क्षेत्रे आहेत याकडे  गोयल यांनी लक्ष वेधले. एकमेकांच्या संस्कृतींचा प्रचार आणि स्टार्टअप 20,  बी20, संयुक्त अरब अमिराती -भारत व्यवसाय परिषद    आणि भारत बाजार यासारख्या उपक्रमांवरही गोयल यांनी प्रकाश टाकला .

वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी  यावेळी संयुक्त अरब अमिरातीला  व्यवसायांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करणाऱ्या 1.4 अब्ज आकांक्षी नागरिकांसह एक मोठी बाजारपेठ म्हणून भारताची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी "30 बाय 30 बाय 30" संधीची रूपरेषा विशद केली, यामध्ये भारताचे सरासरी वय पुढील 30 वर्षांसाठी 30 पेक्षा कमी आहे आणि 2047 पर्यंत भारताच्या  जीडीपीमध्ये $30 ट्रिलियनची भर घालण्याचे  उद्दिष्ट आहे.त्यांनी व्यवसायांना या संधींचा लाभ घेण्यासाठी तसेच  सहकार्य आणि स्पर्धात्मक भावनेने सहयोग करण्यासाठी  प्रोत्साहित केले.

गोयल यांनी त्यांच्या झालेल्या  स्वागतबाबत  आणि संयुक्त अरब अमिराती -भारत सहकार्याला बळ देण्यासाठी ठिकठिकाणी दिसणारा   उत्साह यावेळी नमूद केला . भारतातील  आणि संयुक्त अरब अमिरातीमधील   लोकांचे एकमेकांबद्दल असलेले अतुलनीय  प्रेम आणि आपुलकी, तसेच या भू-राजकीय धोरणात्मक सहकार्याला  बळकट करण्यासाठी उद्योगांचे  अफाट योगदान हे  21 व्या शतकातील भागीदारी आणि बंधुत्व  परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे, असे गोयल यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या नऊ वर्षांत उल्लेखनीय आर्थिक वृद्धी  पाहिली असून, जागतिक स्तरावर  पाच अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था बनून भारताची अर्थव्यवस्था   आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, असे ते म्हणाले. हा परिणामकारक  प्रवास आणि येत्या चार वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गोयल यांनी अधोरेखित केले.  पुढील 25 वर्षे भारताच्या विकासाचा सुवर्णकाळ असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या समारोपाच्या भाषणात पीयूष  गोयल यांनी संयुक्त अरब अमिराती -भारत सहकार्याची  तुलना उधाण आलेल्या समुद्राशी केली. आणि दोन्ही राष्ट्रांमधील वाढती मैत्री आणि सहकार्य दोन्ही बाजूंच्या व्यवसायांसाठी प्रचंड संधी प्रदान करेल  असा विश्वास व्यक्त केला.

***

N.Meshram/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965159) Visitor Counter : 107