कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी बीएसएफच्या नवी दिल्लीतील छावला तळावर  ‘भरड धान्‍य उत्‍पादक संस्थांचे प्रदर्शनाचे’ आयोजन


या वर्षाच्या सुरुवातीला, गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचार्‍यांच्या आहारात 30% भरड धान्यांचा केला समावेश 

Posted On: 06 OCT 2023 3:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सशस्त्र पोलीस कर्मचार्‍यांमध्ये मिलेटस, अर्थात भरड धान्य किंवा श्री अन्नाच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने गृहमंत्रालयाच्या सहयोगाने 6 ऑक्टोबर 2023 रोजी बीएसएफ कॅम्प छावला, नवी दिल्ली येथे 'केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी मिलेटस एफपीओ प्रदर्शन आयोजित केले होते. देशभरातील तीस पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्थांनी (FPOs) या ठिकाणी आपल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन केले. यामध्ये भरड धान्ये, रेडी टू कुक (RTC) पदार्थ आणि रेडी टू इट (RTE) या सारख्या उत्पादनांचा समावेश होता. विविध निमलष्करी दलातील अंदाजे 1,000 कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली.

A person cutting a red ribbon with a group of peopleDescription automatically generated

या वर्षाच्या सुरुवातीला, गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) कर्मचार्‍यांच्या आहारात 30% भरड धान्यांचा समावेश करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे होत आहे. त्या अनुषंगाने निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक पोषण मूल्य असलेल्या अन्नाचा पर्याय म्हणून भरड धान्याच्या वापरला प्रोत्साहन देणे, आणि भरड धान्य हे फायबर(तंतू), खनिजे आणि आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने त्यांच्या शारीरिकदृष्ट्या कष्टाच्या दिनचर्येची मागणी पूर्ण करणे, हे या निर्णयामागचे उद्दिष्ट होते.

A person standing at a podiumDescription automatically generated

या प्रदर्शनात भाज्या आणि मेयोनीझ घातलेला ज्वारीचा पास्ता, परतलेल्या भाज्यांसह रागी नुडल्स, मिलेट पोंगल आणि दही, सोरगम ताक, सुका मेवा घातलेले रागीचे लाडू, मिलेट शेवया, बाजरीचे कुरमुरे यासारख्या भरड धान्यांपासून बनवलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचे कुकिंग काउंटर देखील उभारण्यात आले होते. अधिकारी आणि जवानांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.

त्याशिवाय, ज्वारी, नाचणी आणि मोती बाजरी या धान्यांच्या आकाराच्या सेल्फी बूथ्सनी या सोहळ्याच्या आनंदात  आणखी भर घातली. आनंदी भरड धान्य कुटुंबया संकल्पनेवर आधारित असलेले हे सेल्फी बूथ, जवानांच्या कुटुंबियांचे प्रमुख आकर्षण ठरले. 

***

S.Bedekar/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965058) Visitor Counter : 99


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu