माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती आणि प्रसारण मंत्रालयात विशेष स्वच्छता मोहिम 3.0 ने घेतला वेग

Posted On: 05 OCT 2023 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या मुख्य सचिवालयात आणि देशाच्या विविध भागात असलेल्या इतर उपकार्यालयात/संलग्न कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या तयारीच्या टप्प्यात, म्हणजे 15 सप्टेंबर 2023 पासून डीएपीआरजी च्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध निकषांच्या आधारावर जी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती,त्यांची पूर्तता या अभियान काळात केली जाणार आहे.    अभियानाचा मुख्य टप्पा 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाला असून तो 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाच्या काळात, विशिष्ट स्थळे स्वच्छ करण्यावर भर दिला जाणार असून लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करत, कार्यालयांमधे स्वच्छताविषयक उत्तम पद्धती राबवण्याबद्दल माहिती दिली जाणार आहे.

ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात आहेतिथली काही क्षणचित्रे..

माहिती आणि प्रसारण सचिव,अपूर्व चंद्रा यांनी  या अभियानाची प्रगती आणि नियमितपणे अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या यंत्रणेचा आढावा घेतला. स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान रिक्त झालेल्या जागेच्या वापरा विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आणि मोहिमेदरम्यान त्यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिका-यांचे एक पथक प्रत्यक्ष स्थळी नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

3.निश्चित केलेली  उद्दिष्ट आणि त्यासंदर्भात विविध मापदंडावर सुरु असलेले कार्य याप्रमाणे-

S. No.

Parameters

Targets

  1.  

No. of Outdoor campaigns to be conducted

644

  1.  

Scraps items identified for disposed of (in Kg)

89,926

  1.  

Number of pending references from MPs

92

  1.  

Pending Parliamentary Assurances

15

  1.  

Pending PMO References

04

  1.  

Pending Public Grievances

296

  1.  

Pending PG Appeals

61

  1.  

Number of files to be reviewed

49984

  1.  

Number of e-files identified for closing

1640

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1964841) Visitor Counter : 118