अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीकडून (एनआयआयएफ ) अँकर गुंतवणूकदार म्हणून भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीच्या जपान बँक (जेबीआयसी ) सोबत $600 दशलक्ष भारत-जपान निधीचा (आयजेएफ) प्रारंभ


भारत-जपान निधी पर्यावरणीय शाश्वतता आणि कमी कार्बन उत्सर्जन धोरणांमध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करेल तसेच भारतात जपानी गुंतवणुकीत आणखी वाढ करेल

Posted On: 04 OCT 2023 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीने  (एनआयआयएफ ) अँकर  गुंतवणूकदार म्हणून भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीच्या  जपान बँक (जेबीआयसी ) सोबत $600 दशलक्ष भारत-जपान निधीचा (आयजेएफ ) प्रारंभ   केला आहे. सामायिक प्राधान्य असलेल्या  उदा. हवामान आणि पर्यावरण या क्षेत्रात उभय  देशांमधील सहकार्याचा एक महत्त्वाचा पैलू हा संयुक्त उपक्रम दर्शवतो.

ही घोषणा एनआयआयएफच्या पहिल्या द्वि-पक्षीय निधीला चिन्हांकित  करते, यामध्ये  भारत सरकारचे   लक्ष्यीत  निधीमध्ये  49%  आणि उर्वरित 51% योगदान जेबीआयसी द्वारे देण्यात येत आहे. हा निधी (एनआयआयएफ )लिमिटेडच्या माध्यमातून  (एनआयायएफएल )  व्यवस्थापित केला जाईल आणि जेबीआयसी आयजी  (जेबीआयसी  ची उपकंपनी) एनआयायएफएल ला भारतात जपानी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मदत करेल.

भारत-जपान निधी  पर्यावरणीय शाश्वतता आणि कमी कार्बन उत्सर्जन धोरणांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि भारतातील जपानी गुंतवणूक आणखी वाढवण्यासाठी ‘पसंतीचे भागीदार’ म्हणून भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट ठेवेल.

भारत- जपान निधीची स्थापना ही जपान सरकार आणि भारत सरकार यांच्यातील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

N.Meshram/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1964331) Visitor Counter : 141