वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अबू धाबी अमिरातीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, शेख हामेद बिन झायेद अल नाह्यान भारत-यूएई गुंतवणूक विषयक उच्चस्तरीय संयुक्त कृती दलाच्या अकराव्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषविणार

Posted On: 04 OCT 2023 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष  गोयल यांच्या नेतृत्वाखालील एक प्रतिनिधी मंडळ 5-6 ऑक्टोबर 2023 दरम्यान 11 व्या भारत-संयुक्त अरब अमिराती  गुंतवणूक विषयक उच्च स्तरीय कृती दल बैठकीचे  सह-अध्यक्षपद भूषविण्यासाठी तसेच उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी आणि अबू धाबी अमिरातीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, शेख हामेद बिन झायेद अल नाह्यान यांच्या नेतृत्वाखालील युएईच्या शिष्टमंडळाशी संवाद साधण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहे.

दोन्ही प्रतिनिधी मंडळे, युएई च्या कंपन्यांची भारतातील सध्याची गुंतवणूक आणि भारतीय कंपन्यांची युएई मधील गुंतवणूक याच्याशी संबंधित समस्या/आव्हाने यावर चर्चा करतील.

या बैठकीत संयुक्त कृती दलाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल आणि दोन्ही बाजू आर्थिक वाढीच्या संभाव्यतेसह परस्पर हिताच्या क्षेत्रात गुंतवणूक सुलभ करण्याचे मार्ग शोधतील.

दोन दिवसांच्या दौऱ्यात केंद्रीय मंत्री गोयल भारत-यूएई संबंध अधिक मजबूत करण्यासाठी व्यापार, गुंतवणुकीच्या बाबी आणि सहकार्याची क्षेत्रे विकसित करण्यासाठी द्विपक्षीय बैठका देखील घेतील.

भारत-युएई यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी 2013 मध्ये संयुक्त कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये हे कृती दल दोन्ही बाजूंच्या कंपन्यांपुढील प्रमुख अडचणी सोडवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे.

भारत-युएई सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावरील स्वाक्षरीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरची ही पहिली बैठक असेल.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964317) Visitor Counter : 81


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu