ऊर्जा मंत्रालय
पंतप्रधानांनी एनटीपीसीच्या तेलंगणा महा औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या पहिल्या 800 मेगावॅट संयंत्राचे केले लोकार्पण
तेलंगणा महा औष्णिक वीज निर्मिती केंद्र भारतातील एनटीपीसीच्या वीज निर्मिती केंद्रापैकी सर्वात आधुनिक केंद्र : पंतप्रधान
Posted On:
03 OCT 2023 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणामधील निजामाबाद येथे एका कार्यक्रमात एनटीपीसीच्या तेलंगणा महा औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या पहिल्या 800 मेगावॅट संयंत्राचे लोकार्पण केले. पेड्डापल्ली जिल्ह्यातले हे केंद्र तेलंगणाला वाजवी दरात वीज पुरवेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल. देशातील सर्वात पर्यावरण-स्नेही वीज केंद्रांपैकी हे एक केंद्र असेल.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी तेलंगणातील लोकांचे अभिनंदन केले . ते म्हणाले की कोणत्याही राष्ट्राचा किंवा राज्याचा विकास वीज निर्मितीच्या त्याच्या स्वयंपूर्ण क्षमतेवर अवलंबून असतो कारण त्यामुळे एकाच वेळी जगणे सुखकर होते आणि व्यवसाय सुलभता देखील सुधारते. “सुरळीत वीज पुरवठा राज्यातील उद्योगांच्या वाढीला गती देतो”, असे पंतप्रधान म्हणाले.
तेलंगणा महा औष्णिक वीज निर्मिती केंद्र देशातील एनटीपीसीच्या सर्व वीज निर्मिती केंद्रापैकी सर्वात आधुनिक केंद्र आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. एनटीपीसीच्या तेलंगणा महा औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा पहिला टप्पा पेड्डापल्ली जिल्ह्यातील एनटीपीसीच्या विद्यमान रामगुंडम केंद्राच्या परिसरात उपलब्ध जमिनीवर 10,998 कोटी रुपये मंजूर खर्चाने उभारला जात आहे. हे केंद्र येथील वीज निर्मितीतील 85% वीज तेलंगणा राज्याला पुरवेल.
कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण येथे पाहता येईल.
हे देखील वाचा:
पंतप्रधानांनी तेलंगणा मधील निजामाबाद येथे सुमारे 8000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963825)
Visitor Counter : 112