संरक्षण मंत्रालय
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
Posted On:
02 OCT 2023 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2023
आग्नेय आशियामध्ये भारतीय नौदलाच्या लांब पल्ल्यातील तैनातीचा एक भाग म्हणून, प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन (1TS)- आयएनएस तीर, आयएनएस सुजाता आणि आयसीजीएस सारथी या जहाजांचे आज मलेशियातील पोर्ट क्लांग येथे आगमन झाले आहे.
1TS द्वारे हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये विविध व्यावसायिक आणि सामुदायिक संवाद, प्रशिक्षण देवाणघेवाण, क्रॉस डेक भेटी आणि रॉयल मलेशियन नेव्हीच्या कर्मचार्यांसह क्रीडा सामने आयोजित करण्यात आले आहेत, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी ही जहाजे खुली करण्यात आली आहेत.
1 TS च्या तैनातीचे उद्दिष्ट प्रशिक्षणार्थींना हिंद महासागर क्षेत्रातील मित्र देशांशी भारताच्या सामाजिक राजकीय, लष्करी आणि सागरी संबंधांविषयी माहिती देणे आणि दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय संबंधांना बळकट करणे हे आहे.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963258)
Visitor Counter : 118