संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दलाने स्वच्छता अभियानाची केली सुरुवात

Posted On: 01 OCT 2023 3:34PM by PIB Mumbai

 

'एक तारीख एक तास' मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आणि  हवाई दलाशी निगडीत  इतर नागरिक यांनी दिलेल्या योगदानासह, भारतीय हवाई दलाने  स्वच्छतेसाठी विशेष मोहिमेची सुरुवात केली.  मोहिमेला सुरुवात करताना, हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी आणि हवाई दल मुख्यालय, नवी दिल्लीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, मोतीलाल नेहरू मार्ग आणि नवी दिल्ली महानगरपालिका (एन डी एम एसी) वाहनतळ भागासह संपूर्ण परिसराची स्वच्छता करत सर्व सहभागींचे नेतृत्व केले.  देशातील 750 हवाई दल तळांच्या परिसरातही  अशाच प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली आहे.  02 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेतल्या नंतर सहभागी श्रमवीरांचा सत्कार करण्यात येईल.

स्वच्छतेच्या पायावर इतर सर्व सद्गुणांची इमारत उभी राहतेया महात्मा गांधींच्या उक्तीपासून प्रेरणा घेत ही मोहीम उभी राहिली आहे. त्यानुसार, संपूर्ण स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण वातावरणाच्या मानकांमध्ये सुधारणा करणे, टाकाऊ पदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या उत्पादनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाईल.  सर्व हवाईदल कर्मचारी, जुन्या फायली आणि कागदपत्रे काढून टाकून कार्यालयीन जागा मोकळी करण्याचे एकत्रित प्रयत्न करतील, तसेच जुने नियम आणि धोरणे सुद्धा बदलतील. यादृष्टीने, भारतीय वायुदलाने ई-ऑफिस, IMMOLS आणि e-MMS सारख्या  डिजिटल उपक्रमांचा अवलंब करून या आधीच, उपाययोजना म्हणून कार्यवाही सुरु केली आहे.  या मोहिमेसाठी ठरवून दिल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पद्धती, सूत्रबद्ध केल्या जातील आणि भारतीय हवाई दलाच्या सर्व विभागांना कळवल्या जातील, जेणेकरून एकाच वेळी सर्व ठिकाणी ही मोहीम सारख्याच पद्धतीने सुरू राहील.

***

S.Patil/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962841) Visitor Counter : 70


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu