संरक्षण मंत्रालय
व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी नौदल उपप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 OCT 2023 11:04AM by PIB Mumbai
व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी 1 ऑक्टोबर 23 रोजी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती यांची 1 जुलै 88 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती करण्यात आली होती . ते नेव्हिगेशन आणि डायरेक्शन तज्ञ आहेत.
आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी समुद्र आणि तटीय अशा दोन्ही ठिकाणी विविध प्रकारच्या कमांड आणि स्टाफच्या नियुक्त्या केल्या आहेत. फ्लॅग ऑफिसर म्हणून त्यांनी आयएनएस निशंक, एक क्षेपणास्त्र जहाज, आयएनएस कोरा, एक क्षेपणास्त्र कॉर्व्हेट आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस कोलकाता चे नेतृत्व केले.
2019 मध्ये रिअर अॅडमिरल पदावर बढती मिळाल्यावर, त्यांची भारतीय नौदल अकादमी, एझिमाला येथे डेप्युटी कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2021 मध्ये व्हाईस अॅडमिरल पदावर बढती झाल्यावर, एनएचक्यू संरक्षण मंत्रालय येथे नौदल उपप्रमुख म्हणून सध्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी प्रकल्प सीबर्ड चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.
राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लॅग ऑफिसरना 2020 मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि 2022 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
30 सप्टेंबर 2023 रोजी 38 वर्षांहून अधिक गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले व्हाईस अॅडमिरल संजय महिंद्रू यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
***
JPS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962669)
Visitor Counter : 150