संरक्षण मंत्रालय
स्वच्छता ही सेवा :` संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्ली कॅन्टोन्मेंट इथे झालेल्या स्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे केले नेतृत्व
सफाई कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नाबद्दल त्यांची केली प्रशंसा, महात्मा गांधी यांच्या कल्पनेतली स्वच्छ भारत संकल्पना पुढे नेण्याचे त्यांना केले आवाहन
Posted On:
01 OCT 2023 11:01AM by PIB Mumbai
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत संरक्षण लेखा महानियंत्रक (CGDA) यांनी 1ऑक्टोबर 2023 रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंट इथे आयोजित केलेल्या ‘एक तारीख, एक घंटा, एक साथ’ या विशेष स्वच्छता कार्यक्रमाचे अध्यक्ष पद संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भूषवले. संरक्षण मंत्र्यांनी श्रमदान कार्यक्रमाचे नेतृत्व केले ज्यामध्ये स्वच्छता मोहीम, सामायिक क्षेत्राचे सौंदर्यीकरण आणि वृक्षारोपण मोहिमेचा समावेश होता.
संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि या भागात त्यांनी स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची प्रशंसा केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले सरकार जी लोकाभिमुख सामाजिक चळवळ उभी करत आहे ती पुढे नेण्यासाठी उत्साहाने आणि समर्पण भावनेने कार्यरत राहण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी लष्कर कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान, वित्तीय सल्लागार (संरक्षण सेवा ) रसिका चौबे आणि संरक्षण लेखा महानियंत्रक एस जी दस्तीदार यांनीही विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग घेतला.
***
JPS/SN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962635)
Visitor Counter : 129