ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियान संबंधी 811 कार्यक्रमांमध्ये होणार सहभागी
Posted On:
30 SEP 2023 12:57PM by PIB Mumbai
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या "एक तारीख एक घंटा एक साथ" या मोहिमेत सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी योजना आखली आहे.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने त्याची संलग्न कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांसह देशभरातल्या एकूण 811 कार्यक्रमांची निवड केली असून त्यात ते सहभागी होणार आहेत.
सचिव संजीव चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग मेहरचंद मार्केट, लोधी कॉलनी, नवी दिल्ली आणि अज्ञात सैनिक परिसर , लोधी कॉलनी, नवी दिल्ली येथे स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. या भव्य कार्यक्रमात मेहेरचंद मार्केट असोसिएशनचे सदस्यही सहभागी होणार आहेत.
त्याचप्रमाणे, भारतीय अन्न महामंडळ आणि केंद्रीय वखार निगमच्या मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी बंगाली मार्केट आणि निवासी भागात तसेच मयूर विहार, फेज-1, पॉकेट-2, नवी दिल्ली मधील जवळपासच्या शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहेत.
विभागाच्या अंतर्गत वखार विकास प्राधिकरणाने 1 ऑक्टोबर 2023 रोजी उद्यान क्षेत्रासह हौज खास मार्केटची निवड केली आहे, तर राष्ट्रीय साखर संस्थेने या मोहिमेसाठी कानपूर येथील सिव्हिल लाइन्स स्थित परमत घाटाची निवड केली आहे.
विभाग आणि त्याचे सार्वजनिक उपक्रम/संस्था या भव्य कार्यक्रमात निवासी कल्याण संस्थांचे सदस्य, स्थानिक बाजार संघटना, मंदिरे/घाटांचे पदाधिकारी इत्यादींना सहभागी करून घेतील.स्वच्छता मोहिमेसाठी सुमारे 811 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या स्वच्छता मोहिमेत एकूण 13000 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी ,सार्वजनिक उपक्रम आणि संस्था सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
या मोहिमेतील सर्व उपक्रम सुरळीतपणे पार पडावेत आणि कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी विभागाने संपूर्ण मोहिमेची तयारी आणि 1 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण देशभरात होणार्या उपक्रमांच्या देखरेखीसाठी सहसचिव स्तरावरील नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
***
S.Patil/S.kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962392)
Visitor Counter : 93