माहिती आणि प्रसारण मंत्रालय
15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरूगन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी
Posted On:
30 SEP 2023 11:56AM by PIB Mumbai
15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एस. मुरुगन यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळ सहभागी झाले होते. या प्रतिनिधीमंडळात, ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक उमेश मेहरा आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – ‘एनएफडीसी’चे अधिकारी सहभागी झाले होते. भारत आणि उजबेकिस्तान यांच्यात चित्रपट निर्मितीतील सहकार्याची परंपरा अखंड रशियाच्या काळापासून आहे. एनएफडीसी व उजबेक किनो (उजबेक फिल्म्स) यांच्यातील संयुक्त कार्यातून दोन्ही देशातील हे सहकार्य अधिक मजबूत केले जात आहे.
या कार्यक्रमाआधी, डॉ. मुरुगन यांनी उजबेकिस्तानचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री, ओझोडबेक नजरबेकोव्ह यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील पारंपारिक मैत्री आणि सहकार्याचा उल्लेख करत, तसेच चित्रपट निर्मिती आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली.
यावेळी, डॉ. मुरुगन यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत सरकारच्या मजबूत धोरणांमुळे भारताच्या दृकश्राव्य क्षेत्रात झालेल्या प्रचंड विकासाविषयी उझबेकिस्तानच्या मंत्र्यांना माहिती दिली. सह-निर्मिती, चित्रीकरण आणि निर्मिती नंतरच्या क्षेत्रात, भारत-उजबेकिस्तान यांच्यात सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिली. उझबेक चित्रपट निर्माते व विद्यार्थ्यांसाठी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘एफटीआयआय’ सारख्या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
चित्रपट महोत्सवा दरम्यान, डॉ. मुरुगन यांनी तुर्कीचे संस्कृती आणि पर्यटन उपमंत्री डॉ. बी. मुमकू यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाचीही भेट घेतली. भारतातील चित्रीकरणाच्या उत्कृष्ट संधी तसेच भारतात चित्रपट निर्मिती करताना वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तांत्रिक पायाभूत सुविधांबद्दल देखील त्यांना माहिती देण्यात आली.
***
ShilpaP/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962322)
Visitor Counter : 113