राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान


महाराष्ट्रातील डॉ पवन रमेश नाईक, जान्हवी विजय पेड्डीवार, वेदांत सुदाम डीके यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Posted On: 29 SEP 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (29 सप्टेंबर, 2023) राष्ट्रपती भवनात 2021-2022 साठीचे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले. यावेळी महाराष्ट्रातील डॉ पवन रमेश नाईक, जान्हवी विजय पेड्डीवार, वेदांत सुदाम डीके यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे हे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पुरस्कार, एनएसएस स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी, एनएसएस युनिट्स आणि विद्यापीठे/अधिक दोन परिषदांना त्यांच्या स्वयंसेवी सेवा योगदानासाठी दरवर्षी प्रदान केले जातात.

पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

 

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1962036) Visitor Counter : 147