कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
स्वच्छतेला संस्थात्मक दर्जा देण्यासाठी आणि सरकारी विभागांमधील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय मंत्री, डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्ली येथे उद्या विशेष अभियान 3.0 चा शुभारंभ करणार
विशेष अभियान 3.0 देशभरातली डीएआरपीजीशी संलग्न/अखत्यारीतील सर्व क्षेत्रीय कार्यालये/मिशन/संरक्षण आस्थापना अन्य अस्थापना आणि कार्यालयांवर लक्ष केंद्रित करणार
Posted On:
28 SEP 2023 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2023
केंद्रीय विद्यान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह उद्या, नवी दिल्ली येथे डीएआरपीजी कार्यालय, जवाहर व्यापारी भवनात विशेष अभियान 3.0 चा शुभारंभ करणार आहेत. हे अभियान देशाच्या सर्व भागांमधील डीएआरपीजीशी संलग्न/अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालये/मिशन/ संरक्षण आस्थापना आणि आस्थापना/ कार्यालयांवर लक्ष केंद्रित करेल.
विशेष अभियान 3.0 शुभारंभाच्या कार्यक्रमाला सर्व मंत्रालये/विभागांचे विशेष अभियान 3.0 चे नोडल अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील. या कार्यक्रमा नंतर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे डीएआरपीजी च्या जवाहर व्यापारी भवन, नवी दिल्ली येथील कार्यालयाला भेट देतील आणि विशेष अभियान 3.0 यशस्वी करण्यासाठी डीएआरपीजी ने केलेल्या तयारीचा आढावा घेतील. याच कार्यक्रमात डॉ जितेंद्र सिंह ऑगस्ट 2023 चा 'सचिवालय सुधारणा' मासिक अहवालही जारी करतील.
विशेष अभियान 3.0 च्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग हा नोडल विभाग आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विशेष अभियान 3.0 च्या शुभारंभा बरोबरच विशेष अभियान 3.0 च्या अंमलबजावणीचा टप्पा सुरु होईल. यापुढे सर्व मंत्रालये/विभाग पोर्टलवर आपल्या कामगिरीचा डेटा नियमितपणे अपलोड करू शकतील. हे पोर्टल 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत खुले राहील. या दरम्यान मंत्रालये/विभाग प्रलंबित कामांचा निपटारा करतील आणि निर्धारित निकषांच्या आधारावर तयारीच्या टप्प्यात निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील.
* * *
M.Pange/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961719)
Visitor Counter : 126