केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा (II) 2023 लेखी परीक्षेचे निकाल जाहीर

Posted On: 27 SEP 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2023

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 03 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा (II) 2023 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारावर, खाली नमूद केलेले रोल नंबर असलेले उमेदवार, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये, 2 जुलै 2024 पासून सुरू होणारा 152 वा अभ्यासक्रम आणि 114 वा भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रम (INAC) यामध्ये प्रवेश घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळा (एसएसबी) द्वारे घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. आयोगाच्या www.upsc.gov.in या वेबसाइटवरही निकाल पाहता येईल.

ज्यांचे रोल नंबर यादीत समाविष्ट आहेत, अशा सर्व उमेदवारांची उमेदवारी  तात्पुरती आहे.

परीक्षेसाठी प्रवेशाच्या अटींनुसार, "उमेदवारांना ही विनंती आहे की त्यांनी लेखी निकाल जाहीर झाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत भारतीय सैन्य भर्ती वेबसाइट joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना निवड केंद्रे आणि एसएसबी मुलाखतीच्या तारखा दिल्या जातील, ज्या त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कळवल्या जातील. ज्या उमेदवारांनी यापूर्वी वेबसाईटवर नोंदणी केली आहे, त्यांना ती करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही शंका/लॉग इन समस्येकरता, dir-recruiting6-mod[at]nic[dot]in येथे ईमेल पाठवावा.”

"उमेदवारांना अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या एसएएसबी मुलाखतीदरम्यान संबंधित सेवा निवड मंडळांना (एसएएसबी) आपले वय आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे सादर करावीत.” उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोगाच्या गेट 'सी' जवळील सुविधा काउंटरवर वैयक्तिकरित्या अथवा दूरध्वनी क्रमांक: 011-23385271/011-23381125/011-23098543 वर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते 17:00  दरम्यान संपर्क साधावा.

यादीसाठी येथे क्लिक करा:

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1961388) Visitor Counter : 213


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil