उपराष्ट्रपती कार्यालय
50 टक्के मानवतेला न्याय दिला नाही तर समाज प्रगती करू शकत नाही - उपराष्ट्रपती
Posted On:
27 SEP 2023 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
50 टक्के मानवतेला न्याय न देऊ शकणारा समाज आपली प्रगती करू शकत नाही, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम हे ‘युगकालीन विकास’ म्हणून संमत झाल्याबद्दल कौतुक करताना, हे विधेयक महिलांच्या हक्कांची मान्यता आणि त्यांच्या हक्कांची पुष्टी करत आहे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
राजस्थानमधील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) च्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना ते आज संबोधित करत होते. लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी शिक्षण सर्वात ‘प्रभावी आणि सामर्थ्यशाली ’ यंत्रणा असून शिक्षणाच्या माध्यमातूनच भारताच्या विकासाला गती मिळत आहे, असे ते म्हणाले.
परिवर्तनाचे शिलेदार आणि लोकशाहीतील एक महत्वाचा घटक म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिनिधींकडे नेहमीच कार्याचा लेखाजोखा मागितला पाहिजे असे त्यांनी सांगितले. लोकशाही प्रक्रियेत जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देत संसदेत याचिका सादर करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, यावर त्यांनी भर दिला.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961277)
Visitor Counter : 120