उपराष्ट्रपती कार्यालय

एका ऐतिहासिक घडामोडीत,अध्यक्षांनी राज्यसभेतील उपाध्यक्षांसाठी सर्व महिलांचा समावेश असलेल्या पॅनेलची केली स्थापना


राज्यसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 वर चर्चा होत असताना 13 महिला सदस्यांचा केला या पॅनलमध्ये समावेश

Posted On: 21 SEP 2023 2:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023

 

नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक, 2023 वर राज्यसभेत चर्चा होत असताना एका ऐतिहासिक घडामोडीमध्ये, उप-राष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी, दिवसभरासाठी राज्यसभेतील 13 महिला सदस्यांचा समावेश असलेल्या उपाध्यक्षांचे  पॅनेल तयार  केले आहे  .

उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले की, या खुर्चीवर महिलांची उपस्थिती संपूर्ण जगाला एक शक्तिशाली संदेश देईल आणि बदलाच्या या कालखंडात महिलांनी एक 'कमांडिंग पोझिशन' धारण केली होती याचे ते प्रतीक ठरेल.

उपसभापतींच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित केलेल्या महिला राज्यसभा सदस्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1.      श्रीमती पी. टी. उषा

2.      श्रीमती एस. फांगनोन कोन्याक

3.     श्रीमती जया बच्चन

4.     कुमारी  सरोज पांडे

5.     श्रीमती रजनी अशोकराव पाटिल

6.     डॉ. फौजिया खान

7.    कुमारी   डोला सेन

8.    कुमारी   इंदु बाला गोस्वामी

9.     डॉ. कनिमोझी एनवीएन सोमू

10  कुमारी कविता पाटीदार

11.   श्रीमती महुआ माजी

12.  डॉ. कल्पना सैनी 

13. श्रीमती सुलता देव

Jaydevi PS/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959343) Visitor Counter : 188