सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष मोहीम 2.0
Posted On:
20 SEP 2023 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023
दिव्यांग सक्षमीकरण विभागाशी संलग्न, विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांबरोबरच क्षेत्रीय तसेच विशेष ठिकाणांऐवजी इतरत्र असलेल्या कार्यालयांमध्ये जागेचे परिणामकारक व्यवस्थापन केले जावे, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी विभागाने विशेष मोहीम 2.0 चे आयोजन केले आहे.
जनसामान्यांचे जगणे सोपे करण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग विविध उत्तमोत्तम पद्धतींची या मोहिमेअंतर्गत अंमलबजावणी करणार आहे. अशा उत्तमोत्तम पद्धती पुढीलप्रमाणे:
- बिरस्पती उच्च माध्यमिक शाळा, राणीपूल, सिक्कीमकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता
Before Cleanliness
After Cleanliness
- सुकेत वृद्धाश्रम, सुंदरनगरच्या ‘पेवर ब्लॉक’ युक्त रस्त्याची स्वच्छता
Before Cleanliness
After Cleanliness
- विशेष मोहीम 2.0 अंतर्गत विविध ठिकाणी श्रमदान
मोहिमेचा भाग म्हणून विभागाने कार्यालयांच्या ठिकाणी चांगले, सोयीस्कर वातावरण निर्माण करण्याच्या पद्धतींची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यामध्ये केवळ विभागाची कार्यालयेच नाही तर, राष्ट्रीय संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांचाही समावेश आहे. विभागाने हाती घेतलेले काही उपक्रम पुढीलप्रमाणे:
- विशेष मोहीम 2.0 विषयी जनजागृती
- कार्यालयांचे सुशोभीकरण
- जागेचा पुरेपूर वापर
- टाकाऊतून संपत्ती – टाकाऊ वस्तूंपासून नव्या वस्तूंची निर्मिती
- भंगाराची विल्हेवाट
- नोंदींचे व्यवस्थापन
- सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा
* * *
S.Bedekar/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959109)
Visitor Counter : 126