संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अखिल भारतीय थल सैनिक शिबिर 2023 चे एनसीसी महासंचालकाच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 20 SEP 2023 11:48AM by PIB Mumbai

अखिल भारतीय थल सैनिक शिबिराचे दिल्ली कॅंट येथील करिअप्पा परेड ग्राउंडवर 20 सप्टेंबर 2023 रोजी एनसीसी महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. सर्व राज्ये आणि केंद्राचा समावेश असलेल्या 17 एनसीसी संचालनालयातून सुमारे 1,547 कॅडेट्सची (867 मुले आणि 680 मुली) यासाठी निवड करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या 12 दिवसांच्या शिबिरात, नेमबाजी, अडथळे प्रशिक्षण, नकाशा वाचन आणि इतर व्यावसायिक प्रशिक्षण स्पर्धांसारख्या अनेक प्रशिक्षणात हे जवान सहभागी होतील.

एनसीसी महासंचालकांनी यावेळी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचे स्वागत केले. हे शिबिर अत्यंत मानाचे असून यातील सहभागामुळे जवानांना साहस, शिस्त आणि सन्मानाने परिपूर्ण जीवनाचे दर्शन घडेल. यातून नेतृत्व आणि सौहार्दाची भावना निर्माण होईल असे ते म्हणाले. लष्करी प्रशिक्षणातील ठळक पैलूंबद्दल माहिती देणे, स्पर्धात्मक भावना निर्माण करणे आणि सहभागी जवानांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

*****

Sonal T/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959002) Visitor Counter : 143