संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी अंदमान आणि निकोबार कमांडला दिली भेट
Posted On:
19 SEP 2023 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2023
संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी आपल्या दोन दिवसीय अंदमान आणि निकोबार दौऱ्यादरम्यान अंदमान आणि निकोबार कमांड (ANC) च्या मुख्यालयाला भेट दिली. अजय भट्ट यांच्या दौऱ्याची 18 सप्टेंबर 2023 रोजी सांगता झाली. संरक्षण राज्य मंत्री यांच्या मुख्यालय भेटीमध्ये कमांडर-इन-चीफ, अंदमान आणि निकोबार कमांड (ANC) एअर मार्शल साजू बालकृष्णन यांच्यासोबत सर्वसमावेशक ब्रीफिंग आणि ऑप चर्चेचा समावेश होता. या भेटीदरम्यान, अजय भट्ट यांनी अनेकांशी संवाद साधला, ज्यात नयनरम्य द्वीपसमूहाचे सामरिक महत्त्व अधोरेखित झाले.
संरक्षण राज्य मंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात आयएनएस उत्क्रोश येथील संकल्प स्मारकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण करून केली. त्यानंतर संरक्षण राज्य मंत्र्यांनी राज निवास येथे नायब राज्यपाल ॲडमिरल डी के जोशी (निवृत्त) यांची औपचारिक भेट घेतली.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958819)
Visitor Counter : 125