पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे मानले आभार
Posted On:
17 SEP 2023 8:19PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि अन्य जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"माननीय @rastrpatibhavan जी, आपल्या हार्दिक शुभेच्छांसाठी मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. समृद्ध आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपली प्रेरणा आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे "
उपराष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"हृदयस्पर्शी शुभेच्छांबद्दल धन्यवाद @VPIndia जगदीप धनखड जी."
माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"माननीय @ramnathkovind जी हृदयपूर्वक आभार. आपले स्नेहपूर्ण शब्द प्रेरणा देणारे आहेत."
माजी उपराष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"तुमच्या विशेष शुभेच्छांबद्दल आभार @MVenkaiahNaidu गारु."
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“मी माझे मित्र पंतप्रधान @KumarJugnauth यांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानतो.”
इटलीच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद पंतप्रधान @GiorgiaMeloni."
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958354)
Visitor Counter : 149
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam