पंतप्रधान कार्यालय
सर एम. विश्वेश्वरय्या यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
तसेच अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2023 9:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर एम. विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे.
यावेळी मोदींनी सर्व मेहनती अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की, सर एम. विश्वेश्वरय्या यांचे व्यक्तिमत्त्व पिढ्यानपिढ्यांना नवनिर्मितीसाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी प्रेरणा देणारे आहे. पंतप्रधानांनी चिक्कबल्लापुरा येथील क्षणचित्रे ही सामायिक केली, जिथे त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या भेटीदरम्यान सर एम. विश्वेश्वरय्या यांना श्रद्धांजली वाहिली होती.
एक्स पोस्ट्समध्ये पंतप्रधान म्हणाले;
“अभियंता दिननिमित्ताने आम्ही दूरदर्शी अभियंता आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वाचे धनी सर एम. विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहतो. पिढ्यानपिढ्यांना नवनिर्मितीसाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी ते सतत प्रेरणा देत आहेत. चिक्कबल्लापुरा येथील काही क्षणचित्रे सोबत जोडत आहे, जिथे मी या वर्षाच्या सुरुवातीला माझ्या भेटीदरम्यान त्यांना आदरांजली वाहिली.
“सर्व मेहनती अभियंत्यांना #EngineersDay निमित्त शुभेच्छा! त्यांचे कल्पक मन आणि अथक समर्पण हेच आपल्या देशाच्या प्रगतीचा कणा आहेत. पायाभूत सुविधांपासून ते तंत्रज्ञानातील प्रगतीपर्यंत त्यांचे योगदान आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करते.”
****
Shilpa P/G. Deoda/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1957567)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam