अर्थ मंत्रालय
जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीच्या चौथ्या बैठकीचे 14 ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान मुंबईत आयोजन
Posted On:
13 SEP 2023 5:11PM by PIB Mumbai
मुंबई, 13 सप्टेंबर 2023
जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीच्या चौथ्या बैठकीचे 14 ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान मुंबईत आयोजन केले जाणार आहे. या बैठकीत जी20 सदस्य देश, विशेष आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 50 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत डिजिटल आर्थिक समावेशन आणि एसएमई वित्त या क्षेत्रांमध्ये भारताच्या जी20 अध्यक्षते अंतर्गत सुरु असलेल्या आर्थिक समावेशनाच्या कामावर चर्चा केली जाईल.
बैठकीपूर्वी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमईंना) ऊर्जा देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यावर 14 सप्टेंबर, 2023 रोजी एक चर्चासत्र आयोजित केले जाईल. "डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे उच्च आर्थिक वाढीसाठी एमएसएमईंना उर्जा देणे" तसेच "पतहमी आणि एसएमई परिसंस्था" या दोन प्रमुख विषयांवर यावेळी जागतिक तज्ञ चर्चासत्रात भाग घेतील. एमएसएमईंच्या वेगवान आर्थिक समावेशनामध्ये 'डीपीआय'च्या भूमिकेचा या चर्चासत्रात धांडोळा घेतला जाईल.
डिजिटल आर्थिक समावेशनासाठी जी20 आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची (जीपीएफआय) उच्च स्तरीय तत्त्वे, राष्ट्रीय वित्तप्रेषण योजनांचे अद्ययावतीकरण आणि एसएमई वित्तपुरवठ्यातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी एसएमई सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण साधनांच्या अंमलबजावणीबाबत जीपीएफआय कार्यावर जीपीएफआय सदस्य या दोन दिवसांत चर्चा करतील.
जीपीएफआय बैठकी अंतर्गत 16 सप्टेंबर 2023 रोजी “डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे आर्थिक समावेशन वाढवणे: डिजिटल आणि वित्तीय साक्षरता तसेच ग्राहक संरक्षणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण” या विषयावर एक चर्चासत्र देखील आयोजित केले जाईल.
चौथ्या जीपीएफआय डब्ल्यूजी बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी मुंबईतील कान्हेरी लेणींनाही भेट देतील.
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957027)
Visitor Counter : 166