शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम
प्रलंबितता कमी करणे, संस्थांमध्ये स्वच्छता करणे ,अंतर्गत देखरेख यंत्रणा बळकट करणे, कर्मचाऱ्यांना दप्तरनोंद व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षण देणे आणि प्रत्यक्ष नोंदी डिजीटल करणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश
Posted On:
13 SEP 2023 9:03AM by PIB Mumbai
प्रलंबित बाबींच्या निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून, (एससीडीपीएम ) शिक्षण मंत्रालयाच्य उच्च शिक्षण विभागाने डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत देशभर विशेष मोहीम राबवत खालील विविध प्रलंबित बाबींचा निपटारा केला.
. सार्वजनिक तक्रारी प्राप्त आणि निपटारा : 95.71% सार्वजनिक तक्रारींचे ( प्राप्त 27600 तक्रारींपैकी 26417) निराकरण करण्यात आले आहे
. खासदारांकडून संदर्भित : खासदारांकडून प्राप्त झालेल्या संदर्भित तक्रारी 75.10% निर्देश (प्राप्त 466 तक्रारींपैकी 350) निकाली काढण्यात आल्या आहेत.
. संसदीय आश्वासन: 59.50% संसदीय आश्वासने निकाली काढण्यात आली आहेत (प्राप्त 79 पैकी 47 ).
. सार्वजनिक तक्रारी अपील: 90.50% सार्वजनिक तक्रारींचे अपील (प्राप्त 6588 तक्रारींपैकी 5962) निकाली काढण्यात आले आहेत.
. निपटारा करण्यात आलेल्या एकूण फाईल्स : निपटारा करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या (निश्चित करण्यात आलेल्या एकूण 8329 पैकी 6652 फाईल्स ) फाईल्सपैकी 79.87% फाइल्सचा निपटारा
. देशातील 89 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
***
Jaydevi PS/SBC/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956817)
Visitor Counter : 165