संरक्षण मंत्रालय
संरक्षण विभाग दर महिन्याला सुमारे 80 हून अधिक स्वच्छता मोहिमांच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी वचनबद्ध
Posted On:
12 SEP 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता कायम राखत, संरक्षण विभागाने जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत देशभरात एकूण 655 स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमांमुळे कामाच्या ठिकाणच्या वातावरणात सुधारणा झाली आहे, जागेचे व्यवस्थापन झाले आहे आणि कामाच्या ठिकाणी निरोगी वातावरण निर्माण होण्याबरोबरच महसूल निर्मिती देखील झाली आहे.
या समर्पित प्रयत्नांचा परिणाम म्हणून या कालावधीत 53,698 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. भंगार मोडीत काढण्याच्या धोरणानुसार, या अव्यवस्थित स्थळांवरील भंगार साहित्याची विल्हेवाट लावल्यामुळे 76.92 लाख रुपयांचा महसूलही प्राप्त झाला आहे. या मोहिमेंतर्गत, डीजीडीई,डीजीएएफएमएस, डीजीबीआर, सीजीडीए आणि सीएसडी यांच्यासह सर्व संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये अनावश्यक फाइल्स काढणे, भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, कार्यालयाबाहेर आणि आवारात स्वच्छता मोहिमेसारखे विविध उपक्रम हाती घेण्यात आले, ज्यात लोकांनी पूर्ण उत्साहाने सहभाग घेतला.
संरक्षण विभाग हा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता विशेष मोहिम 2.0 मधील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांपैकी एक होता, ज्यामध्ये एकूण 5922 बाहेरच्या स्थळांचा समावेश होता. गेल्या काही वर्षात स्वच्छता हा वर्षातून एकदा होणारा उपक्रम राहिलेला नाही आणि तो संरक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाच्या ठिकाणी स्वच्छतेला एक सवय बनवण्याची विभागाची बांधिलकी त्यामुळे अधोरेखित होत आहे. ज्यामध्ये स्वच्छ आणि नीटनेटक्या कार्यस्थळाला प्रोत्साहन देण्यावर आणि संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
संरक्षणमंत्र्यांनी गेल्या वर्षी या मोहिमेची प्रशंसा केली होती आणि त्यांनी नमूद केल्यानुसार, महात्मा गांधींनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाली आहे, भौगोलिक सीमा ओलांडत देशाच्या कानाकोपऱ्यात ही मोहीम पोहोचली आहे.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956712)