निती आयोग
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी नीती आयोगाने हाती घेतली विशेष मोहीम 2.0
Posted On:
12 SEP 2023 12:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
महात्मा गांधींना श्रद्धापूर्वक मानवंदना देण्याच्या दृष्टीकोनातून, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या यशामुळे,प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने 2022 आणि 2023 मध्ये देखील ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, संसद सदस्य, राज्य सरकारे, आंतर-मंत्रालयीन समित्या यांच्याकडून आणि मंत्रालयांतील संसदीय आश्वासने यांचे वेळेवर आणि प्रभावी निराकरण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत विशेष मोहीम 2.0 हाती घेण्यात आली. संसद सदस्य, राज्य सरकारे, आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत आणि मंत्रालये/विभागांद्वारे संसदीय आश्वासनांसंदर्भातील सार्वजनिक तक्रारींचे संदर्भ वेळेवर आणि प्रभावीपणे निकाली काढणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. स्वच्छ भारत अभियान "विशेष मोहीम 2.0" चा उद्देश नोंदीचे व्यवस्थापन, स्वच्छता (कार्यालयातील वा बाहेरील) आणि कार्यालयातील भंगाराची विल्हेवाट लावणे, जागा मोकळी करणे ही कामे देखील नीति आयोगाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत.
या मोहिमेअंतर्गत, सार्वजनिक तक्रारी, संसदीय आश्वासने, पंतप्रधान कार्यालयातील संदर्भ आदींचा निपटारा करण्यास गती मिळाली आहे. नोंद व्यवस्थापन अंतर्गत,अनेक फायलींचा आढावा घेऊन अनावश्यक काढून टाकण्यात आल्या , जागा रिकामी केली गेली आणि कार्यालयीन भंगाराची विल्हेवाट लावून त्याद्वारे महसूल मिळविण्यात आला. पुनरावलोकनासाठी ठेवलेल्या प्रत्यक्ष फायलींपैकी,एकूण 75% पेक्षा जास्त फायलींचे पुनरावलोकन झाले आहे.
याव्यतिरिक्त, या कालावधीत जवळपास 95% सार्वजनिक तक्रारी आणि अपीले निकाली काढण्यात आली आहेत. अनावश्यक भंगार साहित्य आणि कालबाह्य वस्तू देखील विल्हेवाटीसाठी बाजूला ठेवल्या आहेत.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या एससीडीपीएम (SCDPM) पोर्टलवर नीती आयोगाद्वारे निर्धारित लक्ष्य आणि त्यात मिळालेले यश तसेच या उपक्रमाची छायाचित्रे देखील अपलोड करण्यात आली आहेत:-
Before After
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956539)
Visitor Counter : 146