ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या ई-लिलावात खुल्या बाजारात विक्री (देशांतर्गत) योजनेअंतर्गत 1.66 लाख मेट्रिक टन गहू आणि 0.17 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्री केली.
ई-लिलावात लहान आणि अंतिम टप्प्यातील किरकोळ व्यापाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने किरकोळ विक्री दरात कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
Posted On:
11 SEP 2023 10:53AM by PIB Mumbai
देशात गहू आणि आट्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात उपाय योजना करण्याच्या भारत सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून, गहू आणि तांदूळ यांचा साप्ताहिक ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता. 11 वा ई-लिलाव 06.09.2023 रोजी आयोजित केला होता. या ई लिलावात देशभरातून 500 डेपोमधून एकूण 2.0 लाख मेट्रिक टन गहू आणि 337 डेपोमधून एकूण 4.89 लाख मेट्रिक टन तांदूळ देऊ करण्यात आला.
या ई लिलावात 1.66 लाख मेट्रिक टन गहू आणि 0.17 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्री झाली. ई-लिलावात, सरासरी दर्जाच्या गव्हासाठी भारित सरासरी राखीव किंमत 2150/ रुपये प्रति क्विटलच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत 2169.65 रुपये प्रति क्विंटल इतकी मिळाली आणि शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत (युआरएस) असलेल्या गव्हासाठी भारित सरासरी राखीव किंमत 2125 रुपये प्रति क्विटलच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत 2150.86 रुपये प्रति क्विंटल इतकी मिळाली.
तांदळाला भारित सरासरी राखीव किंमत 2952.27 रुपये प्रति क्विटलच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत 2956.19 रुपये प्रति क्विंटल इतकी मिळाली.
ई-लिलावाच्या सध्याच्या टप्प्यात, व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त 100 टन गहू आणि 1000 टन तांदूळ देऊ केला असून त्याद्वारे किरकोळ किमतीत कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा निर्णय लहान आणि अंतिम टप्प्यातील किरकोळ व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला असून त्यांना या लिलावात मोठ्या संख्यने भाग घेता यावा आणि त्यांच्या पसंतीच्या डेपोमधून बोली लावणे शक्य व्हावे हा त्यामागील उद्देश आहे.
साठेबाजीला आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांना खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) गहू विक्रीच्या कक्षेपासून दूर ठेवण्यात आले होते आणि खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत ) गहू खरेदी केलेल्या प्रोसेसर्सच्या पीठ गिरण्यांमध्ये नियमित तपासणी/निरीक्षण केले जात आहे. 05.09.23 पर्यंत देशभरात 898 तपासण्या करण्यात आल्या आहेत.
***
Jaydevi PS/Bhakti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956283)
Visitor Counter : 139