अंतराळ विभाग

जग आज भारताकडे समान भागीदार म्हणून पाहत आहे - डॉ जितेंद्र सिंग


आपण आता अमेरिका आणि रशियाला अंतराळ क्षेत्रातील सेवा देत असून 170 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स आणि 250 दशलक्ष युरो पेक्षा जास्त कमवत आहोत: डॉ जितेंद्र सिंग

Posted On: 09 SEP 2023 2:02PM by PIB Mumbai

 

जग आज भारताकडे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यात समान भागीदार म्हणून पाहत आहे, असे केन्द्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील सर्वात ज्येष्ठ राष्ट्रप्रमुख आहेत आणि इतर प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आदराने बघतात, असेही ते म्हणाले.

एका आघाडीच्या राष्ट्रीय नियतकालिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत, डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की, आता आपले बहुतेक देशांशी सहकार्याचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिकेच्या सहकार्य संबंधातील सर्वात चांगला भाग म्हणजे यात आपण लहान भाऊ नाही आहोत. आपण आता समान भागीदार आहोत आणि अनेक प्रकारे समानतेपेक्षाही जास्त आहोत.  उदाहरणार्थ, अवकाश क्षेत्रात, आपण अमेरिका आणि रशियाला सेवा देत आहोत.  आपण आधीच 170 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स आणि 250 दशलक्ष युरोपेक्षा जास्त कमावले आहेत. आता आपण अंतराळ क्षेत्रात  8 बिलियन (रु. 66,000 कोटी) अमेरीकी डॉलर्सचा व्यवसाय करत आहोत. आपली ज्या गतीने वाढ होतेय ते पाहता, भारताचा व्यवसाय 2040 पर्यंत 40 अब्ज डॉलर्स (रु. 3.3 लाख कोटी) पर्यंत जाऊ शकतो, तर नुकत्याच आंतरराष्ट्रीय अहवाल, एडीएलने  नमूद केले आहे की आपण 100 अब्ज अमेरीकी डॉलर्स पर्यंत देखील जाऊ शकतो," असे ते म्हणाले.

जगभर, यापुढे होणारी संपूर्ण वाढ मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.  पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात, बहुतेक द्विपक्षीय करार हे विज्ञान आणि नवोन्मेष आधारित होते यावरून हे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

 

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम गगनयानहा इस्रोसमोरील पुढचा मोठा प्रकल्प आहे असे ते म्हणाले.

अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच राष्ट्रांनी आतापर्यंत अवकाशात स्वतःची मानव मोहीम पाठवली आहे.

इस्रोसोबतच खाजगी उद्योगांसाठीही अंतराळ क्षेत्र खुले करण्याचा पंतप्रधान मोदीं यांचा 2020 मधील निर्णय चित्र पालटवणारा असल्याचे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

समन्वयाची प्रक्रिया घडत असून केवळ तीन वर्षांत आपल्याकडे अंतराळ क्षेत्रात 150 हून अधिक खाजगी स्टार्टअप्स आहेत.  सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सीमांकन संपुष्टात आणले जात असून तो पूर्णपणे एकात्मिक दृष्टीकोन असेल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

***

G.Chippalkatti/V.Ghode/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955780) Visitor Counter : 127