विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय युवक आज आकांक्षांच्या बंधनात अडकून राहिलेला नाही कारण आता उपलब्ध असलेल्या अनेक नवीन संधी त्याला त्याच्या अंगभूत योग्यतेनुसार उपजीविकेच्या संधी प्रदान करत आहेत -केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
06 SEP 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2023
भारतीय युवक आता आकांक्षांच्या बंधनात अडकून राहिलेला नाही कारण आता उपलब्ध असलेल्या अनेक नवीन संधी त्याला त्याच्या अंगभूत योग्यतेनुसार उपजीविकेच्या संधी प्रदान करत आहेत असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
स्टार्टअप धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020, अंतराळ क्षेत्र आणि ड्रोन नियमन -मुक्त, नवीन भू-स्थानिक धोरण, नॅशनल रिसर्च फाउंडेशन इत्यादींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या क्रांतिकारी सुधारणांमुळे हे सर्व काही शक्य झाले आहे असे ते म्हणाले.
नवी दिल्ली येथे केएएमपी प्रतिभा उत्सव-2023 ला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, की हा भारताचा सर्वोत्तम काळ आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जागतिक आकांक्षा जागृत झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणले जे भारतातील विद्यार्थी आणि युवकांसाठी नवीन करिअर आणि उद्यमशीलतेच्या संधी खुल्या करण्याच्या आश्वासकतेसह स्टार्ट-अप परिसंस्थेला देखील पूरक आहे .
मोदी सरकारच्या 9 वर्षांचा उल्लेख करत डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की औपचारिक नोकऱ्यांव्यतिरिक्त, देशातील युवकांसाठी सरकारी क्षेत्राबाहेर लाखो संधी आणि शक्यता निर्माण झाल्या आहेत, मग ते स्टार्ट-अप्स असेल , मुद्रा योजना असेल, पीएम स्वनिधी असेल.
डॉ जितेंद्र सिंह यांनी उज्वल यश संपादन करणाऱ्या युवकांचा सत्कार केला. ते म्हणाले की, प्रतिभावान युवकांचा शोध घेण्यावर त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी केएएमपी ला केली.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955297)
Visitor Counter : 128